शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विविध २६ कामगार संघटनांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 15:23 IST

गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारने घेतलेले कामगार विरोधी धोरण, वाढत्या महागाई या विरोधात कोल्हापूरातील विविध २६ कामगार संघटनांनी मंगळवारी एकत्र येऊन मोर्चाद्वारे आवाज उठविला. या मोर्चात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच विशेषत : महिलांची संख्या मोठी होती.

ठळक मुद्देकोल्हापूरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विविध २६ कामगार संघटनांचा मोर्चा

कोल्हापूर : गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारने घेतलेले कामगार विरोधी धोरण, वाढत्या महागाई या विरोधात कोल्हापूरातील विविध २६ कामगार संघटनांनी मंगळवारी एकत्र येऊन मोर्चाद्वारे आवाज उठविला. या मोर्चात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच विशेषत : महिलांची संख्या मोठी होती.सत्ताधारी भांडवलदारांचे हित जोपासत आहे अशी टीका यावेळी करण्यात आली. याप्रश्नी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वा. होणाऱ्या निदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.किमान वेतन १८ हजार रुपये अधिक महागाई भत्ता, कंत्राटीकरण रद्द करा, मानधनी सेवेची पद्धत रद्द करा, मानधन नको-वेतन द्या, रेल्वे विमा संरक्षण खात्यात परदेशी गुंतवणूक धोरण रद्द करा आदी मागण्यांबाबत दूपारी टाऊन हॉल येथून कामगार संघटना संयुक्त कृति समितीने मोर्चास सुरुवात केली. ‘कामगार विरोधी मोदी सरकार’, ‘गरीब विरोधी मोदी सरकार’, ‘बेकारी वाढवणारे मोदी सरकार’ , ‘महागाई वाढवणारे मोदी सरकार ’ अशा घोषणा देत मोर्चेकरी सीपीआर चौक, दसरा चौक, सुभाष रोड, फोर्ड कॉर्नर, उमा टॉकिज, आझाद चौकमार्गे बिंदू चौकात मोर्चाची सांगता झाली.यावेळी अतुल दिघे म्हणाले, काही मालकांनी हा संप कामगारांनी करु नये म्हणून अडवणूकीची भुमिका घेतली. पण ; या कामगारांनी त्यांची दादागिरी जुगारुन या मोर्चात ते सहभागी झाले. याबद्दल मी तुमचे आभार मानतो. केंद्र सरकार भांडवलदारांचे हित जोपासत आहे. त्यामुळे यांनाच ‘अच्छे दिन’ आलेत.ते आम्हाला आलेले नाहीत. याचे कारण म्हणजे सरकारने राबविलेली कामगार विरोधी धोरणे होय. आपल्या कामगार संघटनांनी दिल्लीत निवेदन दिल्यामुळे येथे आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले नाही.मोर्चात इंटक, आयटक, वर्कस फेडरेशन, महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना, आशा वर्कस, भारतीय डाक कर्मचारी संघटना वर्ग- ३ या संघटनांच्या प्रतिनिधींसह एस.बी.पाटील, बाबुराव तारळी, बी.एल.बरगे, नामदेव गावडे, डॉ. सुभाष जाधव, शाहीर सदाशिव निकम, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, आनंदराव परुळेकर, भगवान पाटील, प्रभाकर आरडे आदींचा सहभाग होता. दिलीप पवार यांनी आभार मानले.

धडकी भरणारा मोर्चा...मोर्चात शेतकऱ्यांपासून ते कामगारांपर्यंत तसेच शालेय पोषण आहारमधील महिला, अंगणवाडी सेविका यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.त्यामुळे हा मोर्चा सरकारला धडकी भरवणारा होता,अशा प्रतिक्रिया यावेळी उमटत होत्या.

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर