शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

व्हॅली क्रॉसिंगचा थरार पर्यटकांसाठी ठरला पर्वणी

By admin | Updated: January 21, 2016 00:24 IST

२४० जणांचा भाग : सहा वर्षाच्या बालिकेपासून ७० वर्षाच्या मावळ्याने जागवला विशाळगडचा गनिमी कावा

आर. एस. लाड -- आंबा -किल्ले विशाळगडचा रांगडा बुरुज, खोल दरीतील धुके, त्यातून डोकावणारा प्रभानवल्लीचा जलाशय नि समोरील सह्याद्रीच्या पहाडी रांगा डोळ्यांत साठवत व्हॅली क्रॉसिंगची अनुभूती देणारा थरार कोल्हापूर, मुंबई व बेळगाव परिसरातील हौशी पर्यटकांना तारुण्यात घेऊन गेला.गेल्या तीन दिवसांत हिल रायडर्स व वेस्टर्न माउंटन स्पोर्टस् आयोजित साहसी पर्यटनातील व्हॅली क्रॉसिंगचा थरार २४० गिर्यारोहकांनी अनुभवला. सहा वर्षाच्या वैष्णवी जाधवपासून ७० वर्षाच्या दत्तात्रय थोराडेंपर्यंतच्या मावळ्यांनी विशाळगडचा गनिमी कावा पुन्हा जागवला. शनिवार व रविवारची आठवडी सुटी या थरार अनुभवातून इतिहासाच्या स्मृती जागवणारी ठरली. मुंढा दरवाजातून भोवतालच्या दऱ्या डोळ्यांत साठवणारी मंडळी यावेळी मात्र सेल्फीची स्टीक सांभाळत गडावरून दरीकडे घेतलेला हवेतील सूर टिपत, पहाडी सह्याद्रीवर स्वार झाल्याचा आनंद घेत होती. युवकांबरोबर मुली व महिलांची संख्या पन्नासवर गेली. महिलांचा उत्साह तोंडात बोटे घालणारा ठरला. शनिवारी सत्तर, रविवारी शंभर व सोमवारी ७२ गिर्यारोहकांनी थरार अनुभवल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगितले. स्थानिकांच्या मदतीबरोबर त्यांच्यात उपक्रमाबाबत उत्सुकता मोठी दिसली. कोल्हापूरच्या साहसी पर्यटनात नवी क्रेझ देणारा हा उपक्रम मर्यादित काळाची मोहीम न राहता हा थरार कायमस्वरूपी पर्यटकांना अनुभवता यावा, साहसी थ्रील सामान्यांना लुटता यावे म्हणून शासनाने या उपक्रमाला पर्यटन सुविधेत सामावून घेणाची मागणी पर्यटकांनी केली. कोल्हापूरसह इचलकरंजी, सातारा, बेळगाव, गुहागर येथील तरुण गिर्यारोहणात सहभागी झाले. या उपक्रमात प्रमोद पाटील, विनोद कांबोज, मेहबूब मुजावर, प्रमोद माळी, शिवतेज पाटील, संतोष कदम, परेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सोमवारी सायंकाळी पाच वाजता ही मोहीम थांबली.01गिर्यारोहकांची काळजी घेणारे कार्यकर्ते तीन दिवस उन्हात, तसेच रात्रीच्या कडाक्याच्या थंडीतही उत्साह टिकवून होते. रविवारी व सोमवारी सकाळचे धुके होते. धुक्यातले क्रॉसिंग डोळे दीपवणारे ठरले. संयोजकांनी सहभागी गिर्यारोहकांना चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली होती. मात्र, पायथ्याला पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने विकत पाणी घ्यावे लागले. २०० रुपये बॅरल असा पाण्याचा दर होता. तीस कार्यकर्ते दिवस-रात्र झटले.02कोल्हापूरचे उपप्रादेशिक अधिकारी सतीश जाधव यांची कन्या सहा वर्षाच्या वैष्णवीने येथील थरार अनुभवला. शनिवारी ती बागेत खेळताना पडली नि तिच्या डाव्या हाताला दुखापत झाली. तरीही तिने बँडेज बांधून विशाळगडची दरी पार केली. चिमुकलीच्या साहसाचे दर्शकांतून कौतुक झाले. दीड वर्षाच्या बालिकेसह एका मातेनेही हा थरार अनुभवला03शिवकालीन गड परिसरात हे साहसी उपक्रम पर्यटकांना उपलब्ध केले तर शिवकालीन इतिहास नव्या पिढीत रुजविता येईल व गडाचे संवर्धन करण्यास चालना मिळेल, असा विश्वास प्रमोद पाटील व कांबोज यांनी समारोपात व्यक्त केला.