शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

पराभव दिसू लागल्यानेच मुश्रीफ यांच्याकडून वल्गना - राहुल चिकोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 10:35 IST

Politics Kolhapur- मुघल सैनिकांना जसे पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे, तसे कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रत्येक ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिसत आहेत. निवडणुकीत आपला पराभव दिसू लागल्यानेच त्यांच्याकडून वल्गना सुरू असल्याची टीका भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून केली.

ठळक मुद्देपराभव दिसू लागल्यानेच मुश्रीफ यांच्याकडून वल्गना - राहुल चिकोडेचंद्रकांत पाटील यांची विकासकामे पाहावीत

कोल्हापूर : मुघल सैनिकांना जसे पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे, तसे कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रत्येक ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिसत आहेत. निवडणुकीत आपला पराभव दिसू लागल्यानेच त्यांच्याकडून वल्गना सुरू असल्याची टीका भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून केली.खोटे बोल, पण रेटून बोल, या उक्तीप्रमाणे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाबडेपणाचा खोटा आव आणला आहे. कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याची काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना अनेक तांत्रिक त्रुटींमुळे रेंगाळली. तीर्थक्षेत्र विकास आराखडासुद्धा महापालिकेच्या उदासीनतेमुळे रखडला आहे; पण निवडणुकीच्या तोंडावर ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या अपयशी कारभाराचे खापर ते भाजपवर फोडू पाहत आहेत.महापालिकेत ढपला पाडण्याची पद्धती त्यांच्याच काळात रुजली. चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री असताना कोल्हापूर महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य केले. भाजप युतीची सत्ता असताना राजकीय द्वेषातून आणि भाजपला श्रेय मिळू नये, यासाठी महापालिकेने अनेक प्रस्ताव पाठवले नाहीत.महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आता कोल्हापूरकरांची दिशाभूल करायची, असा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. मात्र कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, त्यांना वस्तुस्थिती माहीत आहे.या मंडळींच्या काळातच कोल्हापूरकरांवर टोल लादला. द्वेषातून बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा मंत्री मुश्रीफ यांनी द्वेषाचा चष्मा उतरून चंद्रकांत पाटील यांची विकासकामे पाहावीत, असेही चिकोडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर