शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची...!

By admin | Updated: July 28, 2015 01:24 IST

कोल्हापूर-नंदवाळ दिंडी : टाळ-मृदंगाच्या तालावर विठूचा गजर

कोल्हापूर : टाळ-मृदंग वाजती, आंगदे प्रेमे गर्जती, भद्रजाती विठ्ठलाचे, मुखी विठ्ठलनामाचा गजर... हाती भागवत धर्माची भगवी पताका, डोक्यावर पांढरी टोपी, गळ््यात टाळ, तर महिलांच्या डोईवर तुळशी वृंदावन, टाळ-मृदंगाचा अखंड गजर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांसह महाराष्ट्रातील विविध संतांच्या प्रतिमा, फुलांनी सजलेला रथ, पालखी अशा लव्याजम्यानिशी कोल्हापूर-नंदवाळ दिंडी मोठ्या उत्साहात झाली. या दिंडीत हजारो भाविकांनी सहभाग घेतला. श्री ज्ञानेश्वर-माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाच्यावतीने गेल्या १२ वर्षांपासून कोल्हापूर-नंदवाळ पायी दिंडीचे आयोजन केले जाते. पंढरपूरच्याही आधी विठुराया नंदवाळी आला म्हणून या स्थानाचे विशेष महत्त्व आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात महालक्ष्मी दिनदर्शिकेचे मालक सदाभाऊ शिर्के यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती झाली. त्यानंतर चांदीच्या पादुका आणि पालखी पूजन रामचंद्र काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी बाळासाहेब पोवार, रामभाऊ चव्हाण, दिंडीप्रमुख आनंदराव लाड महाराज, आमदार चंद्रदीप नरके, किसन भोसले, पोलीस निरीक्षक अमृत देशमुख, नगरसेवक आर. डी. पाटील, रामचंद्र काळे, रमेश रणदिवे आदी उपस्थित होते. या सोहळ्यानंतर विणेकरी, टाळकरी, मानाचे अश्व, मानदंड धरणारे मानकरी आणि विठ्ठल नामाचा गजर करणारे वारकरी अशी पायी दिंडी सुरू झाली. अत्यंत शिस्तबद्धरितीने भजन, कीर्तन करत दिंडी बिनखांबी गणेश मंदिर येथून मार्गस्थ झाली. ही दिंडी निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, खंडोबा तालीम, जुना वाशी नाका, सानेगुरुजी वसाहतीमार्गे पुईखडी येथे आल्यानंतर संकल्पसिद्धी मंगल कार्यालयासमोर दुपारी एक वाजता रिंगण सोहळा झाला. या सोहळ्याचे पूजन महापौर वैशाली डकरे, उपमहापौर ज्योत्सना मेढे-पवार, नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, मधुकर रामाणे, चंद्रकांत घाटगे आदींच्या उपस्थित झाले. दिंडी मार्गावर रामचंद्र कुंभार, अभय देशपांडे, ज्ञानेश्वर गवळी, आमदार नरके यांच्यासह शाहू सैनिक तरुण मंडळ, एकजुटी तरुण मंडळ, गोकुळ दूध संघ, अल्ट्राटेक कंपनी आदींनी फराळाचे वाटप केले. रिंगण सोहळ्यानंतर पालखीने नंदवाळकडे प्रस्थान केले. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, जि. प. आरोग्य विभागाने गरजू भाविकांना प्रथमोपचार दिले.(प्रतिनिधी)चांदीची पालखीपुढील वर्षी चांदीची पालखी करण्याचा मानस वारकऱ्यांनी केला आहे. यासाठी ८ किलो चांदी जमा झाली आहे, तर सोमवारी महापौर वैशाली डकरे, नगरसेवक मधुकर रामाणे, सचिन चव्हाण, नगरसेवक शारंगधर देशमुख, सूरज देशमुख, कृष्णराव धोतरे यांनी प्रत्येकी एक किलो चांदी देण्याचे जाहीर केले. दिंडीत अंध वारकरीअंध युवक मंच (गंधर्वनगरी)चे २५ अंध वारकरी या दिंडीत पायी सहभागी झाले होते. या युवकांनी संपूर्ण १४ किलोमीटरचे वारीचे अंतर सर्वांबरोबर पार केले. फराळाचे वाटपआषाढी वारी यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी वाशी येथील व्यापारी संघटना, लोकराजा प्रतिष्ठान तसेच विविध संस्थांनी फराळ व केळी वाटप केले.नंदवाळमध्ये भक्तीचा महासागरसडोली (खालसा) : टाळ-मृदंग, हरिनामाचा गजर व धाव विठ्ठला पाव विठ्ठला, महाराष्ट्राची लेक लाडकी वाचव बा, असा विठ्ठलाचा धावा करीत विठ्ठलभक्तीचा महासागर सोमवारी प्रतिपंढरपूर नंदवाळमध्ये लोटला. सोमवारी पहाटे करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली.नंदवाळ येथील विठ्ठल मंदिरात कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव, जिल्ह्यांतील भाविकांनी रविवारपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. राधानगरी, करवीर तालुक्यातील सडोली, बाचणी, आरे, सावर्डे, हळदी, महे व इतर भागांतून सुमारे १५० दिंड्या ज्ञानोबा-तुकारामच्या गजरात नंदवाळ नगरीमध्ये दाखल झाल्या होत्या.नंदवाळ येथील विठ्ठल मंदिरात सोमवारी पहाटे आमदार नरके यांच्या हस्ते व शंकर शेळके, शंकर फाटक, पोलीसपाटील भीमराव पाटील, भोगावती साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ जाधव, देवस्थान समितीचे सदस्य, ग्रामस्थ, भाविकांच्या उपस्थितीत महापूजा झाली.विठूनामाच्या गजराने नंदवाळ परिसर दुमदुमून गेला होता. भजन, अभंगाच्या तालात वारकरी मंडळींसह भाविक भान हरपून दिंडीमध्ये सहभागी झाले होते. हातात टाळ, डोकीवर वृंदावन आणि मुखी विठ्ठलाच्या नामाचा गजर असे दृश्य सर्वत्र दिसत होते.(वार्ताहर)