तालुक्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे आहे. तालुक्यातील लसीकरण केंद्रासाठी दोन हजार लसीचे डोस आरोग्य विभागाकडून येत आहेत. मात्र लसीकरणासाठी रांगेत दररोज संपूर्ण तालुक्याच्या केंद्रांवर दुप्पट चार हजार नागरिक लसीकरणासाठी रांगेत उभे असतात. सर्वांना लसीकरणाचे डोस दिले, तर कोरोनाला अटकाव करता येईल. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंत ५० हजार ३९७ नागरिकांना लस दिली आहे, तर ग्रामीण रुग्णालयाने ७ हजार ११३ नागरिकांना दिली आहे. लसीकरण मोहीम जोशाने राबविणे गरजेचे आहे. पहिला व दुसरा लसीचा डोस घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. तरी आरोग्य विभागाने शाहूवाडी तालुक्याला लसीचा जादा पुरवठा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
फोटो
मलकापूर नगरपालिकेने लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना उभारलेल्या मांडवाची वाऱ्याने झालेली दुरवस्था.