शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात १२० आरोग्य केंद्रे, खासगी रुग्णालयात लसीकरण सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 19:37 IST

Corona vaccine Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून याअंतर्गत ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त, ६० वर्षांवरील ज्येष्ठ असे ६ लाख ६१ हजार ९८४ नागरिकांना व आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर असे एकूण साडे सात लाख लोकांना १२० आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयातून लस देण्यात येणार आहे. त्यासाठी या नागरिकांनी कोवीन ॲपद्वारे नाव नोंदणी करावी, व प्रशासनाच्या नियोजनानुसार टप्प्याटप्याने लस घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात १२० आरोग्य केंद्रे, खासगी रुग्णालयात लसीकरण सुरुलसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक :जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून याअंतर्गत ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त, ६० वर्षांवरील ज्येष्ठ असे ६ लाख ६१ हजार ९८४ नागरिकांना व आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर असे एकूण साडे सात लाख लोकांना १२० आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयातून लस देण्यात येणार आहे. त्यासाठी या नागरिकांनी कोवीन ॲपद्वारे नाव नोंदणी करावी, व प्रशासनाच्या नियोजनानुसार टप्प्याटप्याने लस घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील नियोजनाबाबत आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, शल्यचिकित्सक अनिल माळी, शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. माळी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना काळात प्रशासनाने आयुष सर्व्हे केला होता त्यानुसार व्याधीग्रस्त व ज्येष्ठांची आकडेवारी उपलब्ध झाली असून सर्व यादी आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांना देण्यात येणार आहे, ते घरोघरी जावून ज्येष्ठांच्या ऑनलाईन बुकींगसाठी मदत करतील. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, शिक्षक, कोतवाल व ग्रामपंचायत कर्मचारी जनजागृती करतील. प्रत्यक्ष केंद्रावर जावून देखील लसीकरण करता येईल मात्र गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी आधी ऑनलाईन नोंदणी करावी. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर