शिरोली गावात एकूण सहा प्रभाग आहेत. या सहा प्रभागांत छत्रपती शिवाजी चौक, घोडेगिरी तालीम, शिवसूत्र माळवाडी, बिरदेव मंदिर, ज्ञानदीप विद्यामंदिर, समाज मंदिर या प्रत्येक प्रभागात लसीकरणाची सोय केली होती. गावातील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला. या मोहिमेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.जेसिका अँड्र्युज, उपसरपंच सुरेश यादव, ग्रामविकास अधिकारी व्ही.बी. भोगण, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, सरदार मुल्ला, जोतिराम पोर्लेकर, संतोष बाटे, उर्मिला जाधव, संग्राम कदम, सुरेखा चव्हाण, अनिता कांबळे यांनी पुढाकार घेतला होता.
फोटो : १७ शिरोली लसीकरण
शिरोली येथे लसीकरण मोहिमेप्रसंगी सरपंच शशिकांत खवरे, सुरेश यादव, महेश चव्हाण, सुनील पाटील उपस्थित होते.