शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कोविड प्रतिबंधक लस न घेतलेल्या पर्यटकांना चांदोली राष्ट्रीय उद्यानात प्रवेश बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 15:24 IST

चांदोली राष्ट्रीय उद्यानास भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

सरुड :  कोरोना व ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व  चांदोली राष्ट्रीय उद्यान येथे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस न घेतलेल्या पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. केवळ दोन डोसचे लसीकरण झालेल्या पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती चांदोली अभयारण्याचे वन क्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी दिली. वन क्षेत्रपाल नलवडे म्हणाले, चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सध्या  कोरोना  व ओमायक्रॉन च्या रुग्ण संख्येतही दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होऊ लागल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर चांदोली राष्ट्रीय उद्यानास भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर ज्या पर्यटकांनी कोविड १९ प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यानांच चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटनासाठी प्रवेश देण्यात येईल. यासाठी प्रत्येक पर्यटकाचे लसीकरण केले असल्याच्या प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार आहे. डोस न घेतलेल्या पर्यटकांना पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे तसेच शासन नियमांचे उल्लघंन करणाऱ्या पर्यटकांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही वनक्षेत्रपाल नलवडे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या