शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

व्ही. एन. शिंदे, अनुप जत्राटकर यांना राज्य वाङ्मय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:45 IST

literature Kolhapur- शिवाजी विद्यापीठातील उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाला राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले पुरस्कार, तर लेखक, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिका संग्रहास विजय तेंडुलकर पुरस्कार जाहीर झाला. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून या पुरस्कारांची घोषणा झाली.

ठळक मुद्देसाहित्य आणि संस्कृती मंडळाकडून घोषणा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र घरपोच प्रदान होणार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाला राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले पुरस्कार, तर लेखक, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिका संग्रहास विजय तेंडुलकर पुरस्कार जाहीर झाला. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून या पुरस्कारांची घोषणा झाली.राज्य शासनातर्फे उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान केले जातात. या अंतर्गत सन २०१९ या वर्षासाठी डॉ. शिंदे यांच्या पुस्तकाला प्रौढ वाङ्मय-विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) या विभागातील पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये आहे. डॉ. शिंदे यांनी सन २०१९ मध्ये आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया हे पुस्तक लिहिले. त्यात आवर्त सारणीतील सर्व ११८ मूलद्रव्यांची माहिती आणि आवर्त सारणीचा इतिहास उलगडून मांडला आहे.

लेखक-दिग्दर्शक जत्राटकर यांना प्रथम प्रकाशन (नाटक/ एकांकिका) विभागातून पुरस्कार जाहीर झाला. त्याची रक्कम ५० हजार रुपये आहे. जत्राटकर यांचा हा पहिला एकांकिका संग्रह असून त्यातील एकांकिकांचे प्रयोग विविध स्पर्धांतून सादर झाले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून यंदा पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र हे साहित्यिकांना घरपोच प्रदान होणार असून पुरस्काराची रक्कम त्यांच्या बँकखात्यावर हस्तांतरित केली जाणार आहे.लोकमतमुळे पुस्तक साकारलेलोकमतमधील विज्ञान सदरातील धन्यवाद मेंडलीव या एका लेखाच्या माध्यमातून हे ४३६ पानांचे पुस्तक लिहिण्याचे बीज माझ्यामध्ये रुजले. त्यासह विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या जिज्ञासेचा त्यात मोठा भाग आहे. यापुढेही लिहीत राहण्यासाठी हा पुरस्कार ऊर्जा देणारा असल्याची प्रतिक्रिया डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर