शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

ऊस परिषद २५ आॅक्टोबरला शक्य-- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मंत्री समितीने यंदाचा हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्यास मान्यता दिल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूरच्या ऊस परिषदेबद्दल शेतकºयांना उत्सुकता आहे. ही परिषद २५ आॅक्टोबरच्यादरम्यान घेण्याचे संघटनेचे नियोजन आहे. दरम्यान, भागविकास निधीसाठी टनास ५० रुपये घेण्यास आमचा तीव्र विरोध राहील, असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. ...

ठळक मुद्दे भागविकास निधीस विरोध; पहिल्या हप्त्याचा आकडा मात्र फोडलेला नाहीसाधारणत: ६२० लाख टनच ऊस उपलब्ध होईल

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मंत्री समितीने यंदाचा हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्यास मान्यता दिल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूरच्या ऊस परिषदेबद्दल शेतकºयांना उत्सुकता आहे. ही परिषद २५ आॅक्टोबरच्यादरम्यान घेण्याचे संघटनेचे नियोजन आहे. दरम्यान, भागविकास निधीसाठी टनास ५० रुपये घेण्यास आमचा तीव्र विरोध राहील, असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. संघटनेने अजून पहिल्या हप्त्याचा आकडा मात्र फोडलेला नाही.

संघटनेची भात परिषद १ आॅक्टोबरला बांबवडे येथे होत आहे. तिथेही ऊस परिषदेबाबत चर्चा अपेक्षित आहे. आमच्या पहिल्या हप्त्याचा प्रश्न सोडवा आणि हंगाम कधीही सुरू करा, असा संघटनेचा पवित्रा आहे. मंत्री समितीने शेतकºयांकडून भागविकास निधी म्हणून प्रतिटन ३ टक्के किंवा टनास जास्तीत जास्त ५० रुपये घेण्यास मंजुरी दिली आहे. जीएसटी लागू झाल्याने ऊस खरेदी कर रद्द झाला आहे म्हणून सरकार ही रक्कम शेतकºयांच्या खिशातून काढून घेत असल्याची टीका खासदार शेट्टी यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘सरकारने दोनचाकी ट्रॉलीस १९ हजार अणि चारचाकीस ९२ हजार रुपये जीएसटी लावला आहे. या वाहनांचा वापर हा शेतकºयांच्याच ऊस वाहतुकीसाठी होतो. असे असताना परत त्याच्याकडून सरकार भागविकास निधी म्हणून पैसे उकळत आहे. त्यास आमचा तीव्र विरोध राहील. सरकारने आमचे ऐकले नाही तर आम्ही न्यायालयातही जाऊ.’नोव्हेंबरपासून हंगाम सोयीचाचदिवाळी २१ आॅक्टोबरला संपते. त्यामुळे हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्यास कुणाचीच अडचण नाही. त्याच्या अगोदर कर्नाटकातील कारखानेही सुरू होण्याची शक्यता धूसरच आहे. दिवाळी झाल्याशिवाय ऊस तोडणी मजूर येत नाहीत. यंदा सरकारने ७२२ लाख टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला असला तरी प्रत्यक्षात तेवढा ऊस नाही. साधारणत: ६२० लाख टनच ऊस उपलब्ध होईल, असा या उद्योगाशी संबंधित जाणकारांचा अंदाज आहे. मुख्यत: सोलापूर जिल्ह्यात यंदा ऊस जास्त आहे. त्यामुळे हंगाम एक नोव्हेंबरला सुरू झाला तरी तो मार्चपर्यंत संपेल. त्यामुळे शिल्लक उसाचाही प्रश्न नाही. आता सुरू असलेल्या पावसामुळे उसाचे वजन वाढणार हे मात्र नक्की आहे.