शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीसाठी पैसे घेताना मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या नावांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:11 IST

तहसीलदार म्हणून नोकरी लावण्यासाठी ८५ लाख रुपये आणि चार गुंठ्यांचा प्लॉट उकळण्याच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांंत पाटील यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रकरणाचे गांभीर्य वाढले : भामट्याविरोधात तक्रार; ८५ लाख, चार गुंठे प्लॉटचा गंडा

कोल्हापूर : तहसीलदार म्हणून नोकरी लावण्यासाठी ८५ लाख रुपये आणि चार गुंठ्यांचा प्लॉट उकळण्याच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांंत पाटील यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून याप्रकरणी संशयित प्रसाद प्रभाकर शिंदे (मूळ रा. गडहिंग्लज, सध्या रा. कोरेगाव पार्क, पुणे) याची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यात येणार आहे. त्याच्या शोधासाठी एक पथक रवाना झाले आहे.

भाजपचे कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा घेतल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या नावाचा वापर, मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाºयाला प्लॉट देण्यासाठी तो संबंधितांकडून लिहून घेतल्याचा मुद्दा यामध्ये कळीचा ठरत असून, अधिवेशनामध्येही हे प्रकरण गाजण्याची चिन्हे आहेत.

अधिक माहिती अशी, तक्रारदार समृद्ध दिलीप मोरे (रा. बालशाही अपार्टमेंट, मंगळवार पेठ, कोल्हापूर) हा नेमबाज आहे. त्याचे वडील दिलीप मोरे हे राज्य उत्पादन शुल्क विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. संशयित शिंदे याने समृद्ध मोरे याला पिस्तूल परवाना मिळवून देऊन विश्वास संपादन केल्यानंतर त्याला क्रीडा कोट्यातून तहसीलदारपदी नोकरी देण्याचे आमिष दाखविले. त्याबदली २०१४ पासून शिंदे याने मोरेकडून वेळोवेळी एकूण ८५ लाख रुपये घेतले. त्याने मोरेला तोरस्कर चौक, बुधवार पेठ येथील संदीप देसाई यांच्या कार्यालयासमोर अनेक वेळा नेले आहे. बाहेर उभे करून तो आतमध्ये जात होता. त्यानंतर देसाई यांच्याशी बोलणे झाले आहे, आपले काम लवकरच होईल, मंत्रालयातून फोन येईल, असे त्याला सांगितले जात होते.

मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या ओएसडीच्या नावाने मोरे याला बनावट फोनही करण्यात आले. मोरे याचा कोल्हापुरात चार गुंठे प्लॉट होता. त्याचे शिंदे याने आपल्या नावावर खरेदीपत्र केले. पैसे, प्लॉट देऊन नोकरी नाही; त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच समृद्ध मोरे याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची सोमवारी (दि. १७) सायंकाळी भेट घेतली. घडलेला प्रकार सांगून तक्रार अर्ज दिला. देशमुख यांनी संबंधित अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत याप्रकरणी चौकशी करत आहेत.

कोण हा शिंदे?संशयित प्रसाद शिंदे हा मूळचा गडहिंग्लज येथील आहे. तो भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करीत होता. त्यातून त्याची पक्षाचे तत्कालीन महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्याशी ओळख झाली. त्यातून त्यांची घनिष्ठ मैत्री झाली. शिंदे हा भामटा असून त्याने मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या नावांचा वापर करून अनेकांची फसवणूक केल्याचे समजते. तो सध्या पुण्यात राहत असून, फसवणूक प्रकरणाची चाहूल लागताच त्याने मोबाईल बंद ठेवला आहे.

व्यवहाराचे डिटेल्स पोलिसांकडेतक्रारदार मोरे याने संशयित शिंदे याच्यासोबत केलेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये काही स्टॅम्प केले आहेत. काही रक्कम रोख स्वरूपात, तर काही धनादेश व खात्यावर जमा केली आहे.त्याचे संपूर्ण डिटेल्स त्यांनी अर्जासोबत पोलिसांना दिले आहेत. शिंदे याच्या बँक खात्यासह मोबाईल कॉल डिटेल्सची माहिती पोलीस घेत आहेत. 

खेळाडूची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल आहे. त्याची चौकशी सुरू असून यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

टॅग्स :fraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूर