शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा ‘बिनधास्त’ वापर

By admin | Updated: January 13, 2015 00:14 IST

दप्तरात स्थान : शिक्षकांबरोबरच पालकांचीही वाढत आहे डोकेदुखी

ज्योतिप्रसाद सावंत - आजरा -शालेय विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा बिनधास्त वापर सुरू असून, मोबाईलने विद्यार्थ्यांच्या दप्तरात स्थान मिळविले आहे. केवळ प्रौढांसाठी असणारे संदेश, क्लिप्स, आदी किशोरवयीन मुलेही एकमेकांसोबत शेअर करू लागल्याने हा प्रकार केवळ शिक्षकांचाच नाही, तर पालकांच्यादृष्टीने डोकेदुखी ठरू लागला आहे.गेल्या चार-पाच वर्षांपासून महाविद्यालयीन युवकांपर्यंत मोबाईल पोहोचला होता, पण गेल्या दोन वर्षांमध्ये हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांपर्यंत मोबाईल पोहोचला आहे. शहरी भागातील मुलांच्या दप्तरात सर्रास मोबाईल दिसू लागले आहेत. बऱ्याच शाळांकडून विद्यार्थ्यांना शालेय आवारात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे; परंतु शाळा सुरू असण्याच्या कालावधीत मोबाईल ‘सायलेंट’वर, तर इतरवेळी त्याचा खुला वापर, असा प्रकार आता रूढ होत चालला आहे.सध्या मोबाईलपासून ते अँड्रॉईडपर्यंतचे सर्व प्रकार पालकांना हाताळता येत नाहीत; पण विद्यार्थी बिनधास्तपणे हाताळताना दिसतात. व्हॉटस्अ‍ॅप तसेच फेसबुकवर आता शालेय विद्यार्थ्यांचे फोटोही झळकू लागले आहेत. कॉल करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने ‘मेसेज’वर संवाद साधला जात आहे. या सर्व प्रकारांत अल्पवयीन मुलांकडून मोबाईलचा गैरवापर वाढत चालला आहे, अशा मुलांवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करताना शिक्षकांवर मर्यादा येत आहेत, तर पालकवर्गास मोबाईलचे पाल्यांचे हट्ट पुरविताना हाल होत आहेत.मोबाईलवरील हिंसक, अश्लील क्लिप्स, गेम्स्, व्हॉटस्अ‍ॅप व संदेशाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये होणारी चर्चा, संदेशाची देवाणघेवाण हा सर्वच प्रकार विद्यार्थ्यांना गैरमार्गाकडे व अनैतिकतेकडे नेणारा ठरत आहे हे निश्चित. फोटोसाठी वापरशालेय विद्यार्थिनींचे फोटो काढण्यासाठीही विद्यार्थी मोबाईलचा वापर करताना दिसतात. आजरा बसस्थानकावर विद्यार्थिनींचे फोटो काढणे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे, यावरून बऱ्याचवेळा वाद होताना दिसतात.घराघरांत वादमोबाईलची विद्यार्थीवर्गांकडून होणारी मागणी व बऱ्याच पालकांकडून या मागणीला होणारा विरोध यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये घराघरांत वाद होताना दिसत आहेत.