शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीत उपनगराध्यक्ष, स्वीकृतसाठी फिल्डिंग विषय समिती सभापती निवडी शुक्रवारी : नगरसेवकांबरोबरच रौप्यनगरीवासियांनाही उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:22 IST

हुपरी : नवनिर्मित हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषदेची पहिलीच सवर्साधारण सभा शुक्रवारी (दि. १२) आयोजित करण्यात आली आहे. या सभेत उपनगराध्यक्ष

ठळक मुद्देहुपरी नगरपरिषदेची पहिलीच सवर्साधारण सभा शुक्रवारीसुरेश हाळवणकर यांचा ‘शब्द’ हा अंतिमकुणाला लॉटरी लागणार याबाबत नूतन नगरसेवकांबरोबरच रौप्यनगरीवासियांनाही उत्सुकता

हुपरी : नवनिर्मित हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषदेची पहिलीच सवर्साधारण सभा शुक्रवारी(दि. १२) आयोजित करण्यात आली आहे. या सभेत उपनगराध्यक्ष पदाबरोबच विविध विषय समिती सभापती निवड, तसेच दोन स्वीकृत नगरसेवकपद निवडीही करण्यात येणार आहेत. या पदावरती कुणाला लॉटरी लागणार याबाबत नूतन नगरसेवकांबरोबरच रौप्यनगरीवासियांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. या नगरपरिषदेची संपूर्ण जबाबदारी ही आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावरती असल्याने त्यांचा ‘शब्द’ हा ‘अंतिम शब्द’ असणार आहे.

उपनगराध्यक्षपदासाठी भाजपामधून जयकुमार माळगे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा व कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीतर्फे स्वीकृत नगरसेवकपदासाठी मातब्बरांनी आपलीच निवड होण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करीत जोरदार व्यूहरचना आखली आहे. नेत्यांची मनधरणी करण्यासाठी उंबरे झिजविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रौप्यनगरीच्या पहिल्या उपनगराध्यक्षपदी व स्वीकृत नगरसेवकपदी कोण? याबाबतची चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

नगरपरिषदेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने नगराध्यक्षपदासह १८ पैकी सात जागा जिंकत सत्ता हस्तगत केली आहे. कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी पाच, शिवसेना, मनसे व अपक्ष प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले. निवडणुकीनंतर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आपल्या ताराराणी आघाडीच्या पाच नगरसेवकांचा रौप्यनगरीच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा उपस्थित करीत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ दोन अपक्षांनीही थेट भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तसेच मनसेच्याही दोन नगरसेवकांनी सत्तेसोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजपा सध्या पूर्ण बहुमतात आला आहे.

भाजपाच्या सातपैकी चार नगरसेवक महिला आहेत. नगराध्यक्ष महिला असल्याने भाजपा नेते उपनगराध्यक्षपदीही एखाद्या महिलेला संधी देऊन महिलांच्या सन्मानाचा वेगळा संदेश देतात की पुरुष नगरसेवकाची निवड करतात याचीही उत्सुकता शहराला लागून राहिली आहे.

सद्य:स्थितीत उपनगराध्यक्ष पदासाठी जयकुमार माळगे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सभागृहातील पक्षीय बलाबल पाहता भाजपा व ताराराणी आघाडीच्या वाट्याला प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवकपद येणार असून दोन्हीही गटात इच्छुकांची संख्या अधिक आहे. भाजपाकडून शहराध्यक्ष सुदर्शन खाडे, अण्णासाहेब शेंडुरे, दिनकरराव ससे, सुनील कल्याणी, सुभाष कागले, तर ताराराणी आघाडीकडून पुंडलिकराव वार्इंगडे, अण्णासाहेब इंग्रोळे, प्रकाश जाधव, आदींच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी हालचाली सुरू झाल्या असून, इच्छुकांनी नेते मंडळीचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली आहे. नेतेमंडळी आता कुणा कुणाला पदांची खिरापत वाटतात व कुणा कुणाला लॉटरी लागते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिलेले आहे.उपनगराध्यक्षपदाबरोबच विविध विषय समिती सभापती निवडदोन स्वीकृत नगरसेवकपद निवडीही करण्यात येणार