काेल्हापूर : देशाचे माजी उपपंतप्रधान, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते थाटामाटात करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा उभा करणारी कोल्हापूर ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद आहे. एक टन वजनाचा आणि नऊ फूट उंचीचा भव्य पुतळा उभा केला आहे. पुतळा व जिल्हा परिषदेच्या चौथा मजला बांधकाम कोनशिलेचे अनावरण नेते शरद पवार यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित झाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, राजेश पाटील, प्रा. जयंत आसगावकर, प्रकाश आबीटकर, चंद्रकांत जाधव, राजू आवळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी अमन मित्तल, के. पी. पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, यशवंतराव चव्हाण पुतळा समितीचे कार्याध्यक्ष व्ही. बी. पाटील, अशोक पोवार, रमेश मोरे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी ज्येेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजू आवळे, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, जयंत आसगावकर, बाळासाहेब पाटील, चंद्रकांत जाधव, धैर्यशील माने, बजरंग पाटील उपस्थित होते. (फाेटो-२२०१२०२१-कोल-यशवंतराव चव्हाण)
जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजला बांधकामाच्या कोनशिलेचे अनावरण शुक्रवारी ज्येेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राजेश पाटील, चंद्रकांत जाधव, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, धैर्यशील माने, संजय मंडलिक, बजरंग पाटील आदी उपस्थित होते. (फाेटो-२२०१२०२१-कोल-यशवंतराव चव्हाण०१) (छाया- नसीर अत्तार)