उपनगराध्यक्षा मुमताज बागवान यांनी पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त पदाच्या निवडीसाठी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नगरसेवकांची व्हिडीओ कॉन्फरन्सची बैठक बोलावली होती. नगरसेवक जमादार यांचा एकमेव अर्ज आल्याने नगराध्यक्ष पाटील यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. मुख्याधिकारी जाधव यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले. सभेला सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रावसाहेब पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्यक्ष दादासोा पाटील, तानाजी आलासे, रमेश भुजुगडे, राजू आवळे, सुरेश बिंदगे आदींची भाषणे झाली.
चौकट - सभा ऑनलाइन सत्कार ऑफलाइन
कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार पालिकेची उपनगराध्यक्ष निवडीसाठीची विशेष सभा मुख्याधिकारी जाधव यांनी ऑनलाइन बोलावली होती. मुख्याधिकारी कक्षातच ही निवडसभा झाली. मात्र, निवडीनंतर सत्कार आणि आभार सभा पालिकेच्या सभागृहात घेण्यात आली. नगरसेवक, समर्थकांनी सभागृह तुडुंब भरले होते. त्यामुळे सभा ऑनलाइन आणि सत्कार ऑफलाइन अशी चर्चा शहरात सुरू होती.
फोटो - ०१०२२०२१-जेएवाय-०३-फारुख जमादार