शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शिवाजी विद्यापीठाने घेतले बसर्गे गाव दत्तक

By admin | Updated: May 22, 2017 16:41 IST

पाणी वाचविण्याचे आवाहन : श्रमदानातून ११0 ट्राली काढला गाळ

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २२ : मुनिजन योजनेअंतर्गत शिवाजी विद्यापीठाने गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे हे गाव दत्तक घेतले असल्याची घोषणा कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी घोषणा केली. उपस्थित शेतकरी, महिला, विद्यार्थी यांना संबोधित करताना नांदवडेकर यांनी पाण्याचे महत्व वेळीच ओळखून त्याचे बचत करण्याचे आवाहन केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार व जलसंधारण शिबिरात ते बोलत होते. एन.एस.एस.च्या माध्यमातून बसर्गे गावाचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून या गावाचा कायापालट करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दि. १६ ते २२ मे २०१७ या कालावधीत झालेल्या या शिबिरामध्ये बसर्गेच्या ओढ्यावरील मुख्य बंधाऱ्यातील गाळ काढण्यात आले तसेच सर्व प्रभागामधील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थी व ग्रामस्थांसाठी योगवर्ग, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन केले होते. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ज्ञ संचालक व बसर्गे गावचे सुपुत्र डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी बसर्गे ग्रामस्थांच्या वतीने शिवाजी विद्यापीठाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याविषयी आश्वस्त केले.

या विशेष शिबिरामध्ये एन.एस.एस.चे स्वयंसेवक, एस. एम. हायस्कुलचे विद्यार्थी, महिला बचत गट सदस्य, ग्रामस्थ या सर्वांच्या श्रमदानातून एकशे दहा ट्रॉली गाळ काढण्यात आला आणि ग्रामस्वच्छता करण्यात आली.

या शिबिरामध्ये महागावचे प्रा. पी. डी. पाटील यांचे "थोडं तरी जगावे समाजासाठी", उत्तूरचे प्रा. राजेंद्र ठाकूर यांचे "स्वातंत्रवीर सावरकरांचा राष्ट्रवाद", कोल्हापूरचे डॉ. अभिजित मुसळे यांनी "ताणतणावमुक्त जीवन" आणि गारगोटीच्या केतकी पाटकर - ठाकूर यांनी मुलाखतीच्या माध्यमातून "उद्योगातून महिला सबलीकरण" याविषयी मार्गदर्शन केले.

गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती प्रा. जयश्री तेली, गटविकास अधिकारी सीमा जगताप, पोलीस निरीक्षक बिपीन हसबनीस, जिल्हापरिषद सदस्य हेमंत कोलेकर, रेखाताई हत्तरकी, वषार्देवी नाडगोंडे, गंगाधर व्हस्कोटी यांनी शिबिरात भाग घेतला. शिबिराचे व्यवस्थापन प्रा.संजीवनी पाटील, प्रा. डी. जी. चिंगळीकर, सेवावर्धिनी संस्थेचे गुरुनाथ कुलकर्णी, अनुलोम संस्थेचे विजय हिरेमठ यांनी केले. बसर्गेचे उपसरपंच सुरेश मणिकेरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी या शिबिरात सहभाग घेतला.

बसर्गे गावचे संकेतस्थळ तयार करणार

याप्रसंगी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी शिवाजी विद्यापीठ व ए बी सॉफ्टच्या सहकार्यातून बसर्गे गावाचे संकेतस्थळ तयार करणार असल्याचे जाहीर केले.  

वर्षभरात गावात डिजिधन, जनधन, प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, अटल बिमा योजना, ठिबक सिंचन, जलसंधारण, विहीर पुनर्भरण, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी योजनांविषयी जनजागरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.डॉ. डी. के. गायकवाड,मुख्य समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग