शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तरुणांचे ऐक्य महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:24 IST

सावरवाडी : नव्या बदलत्या युगात ग्रामीण भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आजच्या तरुणांच्या मध्ये ऐक्य महत्त्वाचे आहे, असे ...

सावरवाडी : नव्या बदलत्या युगात ग्रामीण भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आजच्या तरुणांच्या मध्ये ऐक्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे नूतन अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी केले.

शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडी यांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमप्रसंगी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच रेखा कांबळे होत्या.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून ‌‌‘गोकुळ’चे अध्यक्ष पाटील म्हणाले, समाज परिवर्तनासाठी ग्रामीण तरुणांनी पुढे आले पाहिजे. शासनाच्या विविध योजना गावपातळीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

यावेळी ग्रामपंचायतीतर्फे भेटवस्तूंचे वितरण विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, बलभीम विकास संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील, माजी सरपंच एस. के. पाटील, युवा नेते माधव पाटील. उपसरपंच सचिन पाटील, संजय पाटील, तुळशी सहकार समूहाचे नेते सरदार पाटील, एकनाथ भोपळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी ग्रामसेवक बी. एस. कांबळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. शेवटी मच्छिंद्र कांबळे यांनी आभार मानले.

फोटो ओळ - शिरोली दुमाला (ता . करवीर) येथे ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रास ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या हस्ते संगणक व भेटवस्तू वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच रेखा कांबळे, उपसरपंच सचिन पाटील, डॉ. मधुरा मोरे, सरदार पाटील, अनिल सोलापुरे, माधव पाटील, राहुल पाटील, एकनाथ भोपळे, एस. के. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.