शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

अनोखा जागतिक संगीत दिन : कोल्हापुरात २४ तासांत १२ मैफली, १२० गायकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 17:56 IST

गाण्यांच्या मैफिलीतून गरजूंच्या मदतीसाठी गेली १८ वर्षे सातत्याने आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या प्रतिज्ञा नाट्यरंगने शुक्रवारी २४ तासात १२ मैफिली सादर करून अनोख्या पद्धतीने ‘जागतिक संगीत दिन’ साजरा केला. कॅन्सरग्रस्त कॅन्सरग्रस्त हबीबभाईंच्या आनंदासाठी आयोजित या उपक्रमात १२० गायक आणि गायिकांनीही आपले योगदान दिले. शिवाय या मैफिलीत ऐच्छिक मूल्यातून जमा झालेली रक्कमही गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुपूर्द केली आहे.

ठळक मुद्देअनोखा जागतिक संगीत दिन : कोल्हापुरात २४ तासांत १२ मैफली, १२० गायकांचा सहभागगरजूंच्या शिक्षणासाठी  ‘प्रतिज्ञा नाट्यरंग’तर्फे अर्थसाहाय्य, कॅन्सरग्रस्त हबीबभाईंना दिला आनंद

संदीप आडनाईककोल्हापूर : गाण्यांच्या मैफिलीतून गरजूंच्या मदतीसाठी गेली १८ वर्षे सातत्याने आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या प्रतिज्ञा नाट्यरंगने शुक्रवारी २४ तासात १२ मैफिली सादर करून अनोख्या पद्धतीने ‘जागतिक संगीत दिन’ साजरा केला. कॅन्सरग्रस्त कॅन्सरग्रस्त हबीबभाईंच्या आनंदासाठी आयोजित या उपक्रमात १२० गायक आणि गायिकांनीही आपले योगदान दिले. शिवाय या मैफिलीत ऐच्छिक मूल्यातून जमा झालेली रक्कमही गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुपूर्द केली आहे.‘ना नफ्यासाठी, ना स्वार्थासाठी, आमची मैफिल गरजवंतांच्या आधारासाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या ‘प्रतिज्ञा नाट्यरंग’ने शुक्रवारी ‘जागतिक संगीत दिना’चे औचित्य साधून गुरुवार (दि. २०)च्या मध्यरात्रीपासून शुक्रवारच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांत सलग १२ हिंदी चित्रपटगीतांच्या मैफिली सादर केल्या. उद्यमनगर येथील रामभाई सामाणी स्मृती सभागृहात झालेल्या या मैफिलीत १२० गायक-गायिकांनी योगदान दिले.सुहानी रात ढल चुकी, सूरमयी आॅँखिंयों में, ओल्ड इज गोल्ड, भोर भये पनघट पे, तुम्हे याद होगा, दिवाना हुआ बादल, गुनगुना रहे हैं भवर, छुकर मेरे मन को, संगीत आरोग्यम, दिल ने फिर याद किया, सुनहरे पल आणि रात का समा या मैफिली या २४ तासांत कराओके ट्रॅकवर सादर झाल्या. जयश्री देसाई, किरण रणदिवे यांनी निवेदन केले. रमेश सुतार यांनी ध्वनिसंयोजन केले. आज या संस्थेचा ९५ वा प्रयोग होता. ३६५ दिवसांत ३६५ मैफिली सादर करण्याचा संस्थेचा संकल्प आहे.कॅन्सरग्रस्त हबीबभाईना मिळाला अत्यानंदकॅन्सरग्रस्त असलेले हबीबभाई सोलापुरे यांना गायनातून आनंद मिळावा, हे या मैफिली आयोजित करण्याचे आणखी एक कारण होते. हबीबभाई स्वत: गायक आहेत. त्यांनीही या मैफिलीत गाणे गाइले आहे.गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी मदत सुपूर्दया २४ तासांत झालेल्या सर्व मैफिलींतून जमा झालेली रक्कम वि. स. खांडेकर प्रशालेतील १३ गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी शाळेच्या पर्यवेक्षक नेहा कानकेकर आणि भरत अलगौडर यांच्याकडे ‘प्रतिज्ञा’तर्फे सुपूर्द करण्यात आली.२४ तासांत १२0 गायक-गायिकांचा सहभागया मैफिलीत हबिब सोलापुरे, प्रेषित शेडगे, आनंद पाटील, प्रवीण लिंबड, स्नेहलता सातपुते, संजय चौगुले, शेखर आयरेकर, अरविंद कस्तुरे, संजय शेटके, शिवलाल पाटील, राजेश भुते, सुहास पोतनीस, विजय लांबोरे, मोहन घाडगे, अंजली दुर्गाई, मनोज सोरण, पूजा पवार, सरदार पाटील, पूजा रणदिवे, डॉ. भट, राजश्री सूर्यवंशी, शेखर मोरे, राजेंद्र भंडारे, सतीश कवाळे, सागर कांबळे, राजेंद्र कोरे, राजेंद्र कल्याणकर, अजित आजरी, बसिर मोमीन या गायक-गायिकांचा सहभाग होता.प्रतिज्ञाचा मदतीचा अखंड वसाकोल्हापुरातील प्रशांत जोशी यांनी २000 मध्ये सुरू केलेल्या ‘प्रतिज्ञा नाट्यरंग’ या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित कलेच्या माध्यमातून मानवता हे ध्येय ठेवून गरजूंसाठी आर्थिक मदत जमा केली आहे. गायन असो, राज्यनाट्य स्पर्धा असो, नृत्याचे कार्यक्रम असोत, की अंबाबाईच्या नवरात्रीतील अखंड संगीत सेवा असो, ऐच्छिक मूल्य स्वीकारत त्यात स्वत:च्या आणि दानशूरांनी दिलेल्या रकमेची भर टाकत ती योग्य आणि गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा वसा जोशी यांनी अखंडपणे सुरू ठेवला आहे. केवळ नवरात्रौत्सवात २७ महिलांना तर गेल्या १८ वर्षांत प्रतिज्ञा नाट्यरंगने ३२५ गरजूंना १० लाखांचे अर्थसाहाय्य केले आहे. 

 

टॅग्स :music dayसंगीत दिनkolhapurकोल्हापूर