कोल्हापूर : येथील रुईकर कॉलनीतील युनिक पार्कमधील घरफोडीप्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी तरुणास अटक केली. फिरोज जब्बार शेख (वय २२ रा. विचारेमाळ, शाहू कॉलेजसमोर, सदरबाजार) असे अटक केलेल्यां संशयिताचे नाव आहे. चोरी झालेल्या मुद्देमालापैकी अवघे अडीच हजाराचे साहित्य त्यांच्याकडून हस्तगत केले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कविता विशाल चौगुले (वय ३५ रा. मयाकुमार, न्यू दत्तनगर, नागदेववाडी, ता. करवीर) यांचे रुईकर कॉलनी येथील युनिक पार्कमध्ये बंगला आहे. अज्ञात चोरट्याने दि. १५ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत त्यांच्या घराच्या बंद दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला व आतील एलईडी टीव्हीसह भांडी असा सुमारे २५ हजार ६४० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल होती. पोलिसांनी कसोशीने शोधमोहीम राबवून या घरफोडीप्रकरणी फिरोज जब्बार शेख (२२ रा. विचारेमाळ, सदर बाजार) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या मुद्देमालापैकी स्टीलची २४ ताटे, छोटा टेबल फॅन, स्टीलचे पाण्याच्या चावीचे ८ नळ असा सुमारे अडीच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
फोटो नं.२६०८२०२१-कोल-फिरोज शेख (आरोपी-चोरी)
260821\26kol_12_26082021_5.jpg
फोटो नं.२६०८२०२१-कोल-फिरोज शेख (आरोपी-चोरी)