कोल्हापूर : काँगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल वर्णभेदी वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांना तत्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, त्यांच्यावर फौजदारी दाखल करून अटक करावी, अशी मागणी गुरुवारी कोल्हापूर शहर जिल्हा कॉँग्रेस समितीच्यावतीने करण्यात आली. तसेच यावेळी मंत्री गिरीराजसिंह यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सोनिया गांधी यांच्याविषयी वर्णभेदी उद्गार काढणाऱ्या मंत्री गिरीराज यांचा निषेध करण्याकरिता स्टेशन रोडवरील कॉँग्रेस कार्यालयात शहर जिल्हा कॉँग्रेस समितीच्यावतीने निषेध सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण होते. सभेत चव्हाण यांच्यासह प्रदेश सरचिटणीस अॅड. सुरेश कुऱ्हाडे, संपतराव पाटील, किशोर खानविलकर, महंमद शरीफ शेख, ए. डी. गजगेश्वर, विजयसिंह माने, सुलोचना नाईकवडी, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, अमर देसाई यांची भाषणे झाली.यावेळी लीला धुमाळ, नगरसेवक सचिन चव्हाण, नितीन आडके, उमेश पोर्लेकर, प्रदीप शेलार, दयानंद नागटिळे, स्मिता माने, भरत पाटील, हेमा पाटील आदी उपस्थित होते. महिलांचे आंदोलनकोल्हापूर जिल्हा महिला कॉँग्रेस समितीच्यावतीने स्वतंत्रपणे गिरीराजसिंह यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी निषेधाच्या घोषणा दिल्या. जिल्हाध्यक्ष अंजनाताई रेडेकर, शहराध्यक्ष संध्या घोटणे, सुलोचना नाईकवडे, रुपाली पाटील, भारती केखले, मालती नाळे, विद्या घोरपडे, भैरवी सावंत, शालन घाटगे, भारती वाझे, सरिता कांबळे, रतन ओतारी, आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
केंद्रीय मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
By admin | Updated: April 3, 2015 00:44 IST