शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर उडाली कागदी विमाने --कोल्हापूरची विमानसेवा रखडल्याचा केला निषेध शिवसेनेचे अनोेखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:05 IST

कोल्हापूर / उचगाव : सुरू होणार..सुरू होणार अशी नुसती चर्चा; परंतु प्रत्यक्षात काय विमान हवेत झेप घेत नाही असा अनुभव येत असलेल्या कोल्हापूरकरांचा राग

कोल्हापूर / उचगाव : सुरू होणार..सुरू होणार अशी नुसती चर्चा; परंतु प्रत्यक्षात काय विमान हवेत झेप घेत नाही असा अनुभव येत असलेल्या कोल्हापूरकरांचा राग शिवसेनेने शनिवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत व्यक्त केला. यावेळी हवेत कागदी विमाने उडवून शिवसैनिकांनी डान्स करत विमानसेवा रखडल्याचा निषेध व्यक्त केला.

खासदारांनी नुसतेच संसदेत प्रश्न मांडले, मंत्र्यांना निवेदन दिले, वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेतल्याचा फार्स करत असून जनतेशी ते खेळ करत असल्याची टीका यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर करण्यात आली.

राजाराम महाराजांनी दूरदृष्टीने विमानतळ बांधले; परंतु गेली सहा वर्षे ही विमानसेवा बंद आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव, गोकुळ-शिरगाव या भागातील शेतकºयांनी मातीमोल किमतीने ६५० हेक्टर जमिनी दिल्या. विमानतळाचे विस्तारीकरण राहू दे. किमान नियमित विमानसेवाही सुरू नाही. या प्रश्नाची दोन्ही खासदारांनी दखल घेऊन ही सेवा तातडीने सुरू करावी, अन्यथा शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.कार्यकर्त्यांनी सकाळी विमानतळावर धडक दिली. जाताना हे कार्यकर्ते विमानाची फायबरची प्रतिकृती घेऊन गेले होते. ती विमानतळावर ठेवून असले तरी विमान आता लोकांना उडताना दाखवा, अशी अपेक्षा व्यक्त करत कार्यकर्त्यांनी कागदी विमाने हवेत उडवून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.यावेळी सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रस, शिवाजीराव जाधव, राजू यादव, विनोद खोत, शुभांगी पोवार, कमलाकर जगदाळे, दत्ता टिपुगडे, शशी बीडकर, भगवान कदम, सुनील पोवार, चंद्रकांत पंडित, अवधूत साळोखे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.नामफलकाचे उद्घाटनविमानतळ प्राधिकरणाच्या नामफलकाला शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून फीत कापून त्याचे उद्घाटन केले. या आंदोलनावेळी दोन खासदारांची वेशभूषा करून समीर भोरे व स्वप्नील येळेकर आले होते. त्यांच्यावर शिवसैनिकांनी फुलांचा वर्षाव करत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. आंदोलन ठिकाणी तिकीट विक्री कक्ष उभारला होता.