शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

भूमिगत केबलमुळे चिपळूणला विनाखंड वीज

By admin | Updated: May 12, 2015 21:22 IST

नवीन उपकेंद्राची गरज : महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वेगवान काम

चिपळूण : चिपळूण शहराची विजेची वाढती गरज व शहराचे होणारे औद्योगिकीकरण लक्षात घेता जुने असणारे पॉवर स्टेशन कालबाह्य होऊ लागल्याने नवीन पॉवर स्टेशन उभारुन त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची भूमिगत वीज वाहिनी महावितरणने टाकली. हे काम दर्जेदार व्हावे, यासाठी महावितरणचे व इंफ्राचे अधिकारी सातत्याने लक्ष ठेवून होते. या नवीन स्टेशनमुळे शहराची विजेची गरज भागणार असून, २४ तास वीज उपलब्ध होणार आहे. चिपळूण शहराला १९७० पासून एकच पॉवर हाऊस येथे उपकेंद्र कार्यरत आहे. हे उपकेंद्र जीर्ण झाले असून तेथील साहित्य गंजलेले आहे. शिवाय वाढती लोकसंख्या व वाढती शहरीकरण याचा विचार करता गोवळकोट, पेठमाप, वालोपे, मुरादपूर या भागाला कमी दाबाने वीज पुरवठा सुरु होता. शहराची विजेची गरज भागावी व या सुसंस्कृत शहरात २४ तास वीज पुरवठा सुरु रहावा यासाठी महावितरणने केंद्र सरकारच्या आरएपीडीआरपी योजने अंतर्गत मुरादपूर येथे अद्ययावत तंत्रज्ञानाने व सोयीसुविधा उपलब्ध असलेले दुसरे उपकेंद्र उभारले. या उपकेंद्राला लोटे येथून अतिउच्च दाब स्टेशनमधून १० किमी. जंगलातून वीज वाहिनी टाकण्यात आली आहे. तसेच या उपकेंद्राला कोयनेच्या सबस्टेशनवरुन अतिउच्च दाबाची भूमिगत वीज वाहिनी जोडली आहे. त्यामुळे शहराचा वीज पुरवठा २४ तास सुरळीत राहणार आहे. ही भूमिगत उच्च दाबाची वीज वाहिनी टाकताना शासन नियमाप्रमाणे नगर परिषदेची परवानगी घेणे आवश्यक असते. तसेच नगर परिषद हद्दितील जे नुकसान होईल त्याचे अंदाजपत्रक पालिकेला सादर करावयाचे असते. त्यानुसार पालिकेने सादर केलेल्या अंदाजपत्रकानुसार महावितरणने ९ लाखाची रक्कम आरआय चार्जेस पालिकेकडे भरले आहेत. त्यातून होणाऱ्या नुकसानीची भरपाई किंवा नुतनीकरण पालिकेने करावयाचे असते. नगर पालिकेचा अभियंता या कामासाठी लाईन आऊट देतो. त्या मार्गानेच ही लाईन टाकलेली आहे. त्यामुळे कोणतीही झाडेझुडपे तुटण्याचा प्रश्न नाही. कोणतीही अडचण येणार नाही. शिवाय टाकण्यात आलेली केबल पॉलिकेपची असल्याने ती दर्जेदार आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे १२०० मिमी. म्हणजे ४ फूट खोल जमिनीत ही केबल टाकलेली आहे. ही केबल टाकताना जिथे कठिण खडक आहे त्या भागात वाळू टाकण्याची तरतूद आहे. १ मीटरला ०.२५ मीटर वाळू टाकली जाते. त्यानंतर आरसीसी पाईपलाईन किंवा लेंटर टाकून ती बुजविली जाते. चिपळूण शहरात २.५ किमी. डबल लाईन टाकण्यात आली आहे. भविष्यात या लाईनला काही बिघाड झाल्यास फॉल्ट फायडिंग मशिन या लाईनवर फिरवल्यावर बिघाड आपोआप मिळणार आहे. त्यामुळे जेथे बिघाड असेल त्याच ठिकाणी उपाययोजना करता येईल. या लाईनवर सेन्सेटिव्ह उच्च दर्जाचे संरक्षण आहे. त्यामुळे लहान जरी बिघाड असेल तरी लाईन पूर्ण बंद होते. या लाईनचे एचटी डिझाईन करताना शॉर्टसर्किट किंवा आग लागण्याचे प्रकार होणार नाहीत याची पुरेशी खबरदारी घेण्यात आली आहे. भविष्यात या लाईनवर रुटमार्केट लावण्यात येणार आहेत. या अद्ययावत लाईनमुळे चिपळूणच्या विकासात भर पडणार आहे. आज काम सुरु असताना काही अडचणी आल्या. नळपाणी योजनाचे पाईप तुटणे, बीएसएनएलच्या लाईन तुटणे अशा घटनांमुळे नागरिकांना त्रास झाला असला तरी भविष्यासाठी हा त्रास महत्त्वाचा होता. हे काम करताना इंफ्राचे सहाय्यक अभियंता शरद परीट तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. प्रत्येक गोष्ट पाहूनच ही लाईन टाकण्यात आली असल्याने वीज टंचाई या कामामुळे दूर होणार आहे. (प्रतिनिधी)काम दर्जेदार झाल्याचा अधिकाऱ्यांचा दावाउच्च दाबाच्या भूमिगत लाईनचे काम सुरु असताना कोणतीही तांत्रिक किंवा इतर माहिती न घेता काही कथित पुढाऱ्यांनी नागरिकांची ढाल करुन आपला हेतू साध्य करण्यासाठी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, इंफ्राचे सहायक अभियंता शरद परीट, कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर, अभियंता के. एस. बर्वे, पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली हे काम झाले आहे. हे काम दर्जेदार झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या मुरादपूर पॉवर स्टेशनमुळे चिपळूणवासीयांची गरज भागणार आहे. पॉवर स्टेशनवरील वीजपुरवठा खंडित झाल्यास मुरादपूर उपकेंद्रावरून शहराला वीज पुरवठा केला जाऊ शकतो. शिवाय या उपकेंद्रामुळे गोवळकोट, पेठमाप, वालोपे, मुरादपूर भागासह आजूबाजूच्या परिसराला वीज पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे शहरातील उद्योग, व्यवसायांना लागणारी वीजही मुबलक स्वरुपात मिळणार आहे. कथित पुढाऱ्यांची स्वार्थासाठी कोल्हेकुई; जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न.चिपळूण पॉवर हाऊसवर सध्या पडणारा ताण कमी होणार.शहरासाठी लोटे येथून सप्लाय मिळणार असल्याने २४ तास मिळणार सेवा.आरएपीडीआरपी योजनेंतर्गत मुरादपूर येथे अद्ययावत वीज उपकेंद्र कार्यरत.नवीन भूमिगत एचटी लाईनबाबत नागरिकांत गैरसमज.फॉल्ट फायंडिंग मशिनद्वारे भविष्यात शोधणार बिघाड.महावितरण व इंफ्राच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरु आहे काम.तोडफोडप्रकरणी नगरपालिकेला भरले ९ लाखाचे आरआय चार्जेस.वादळीवारा व अन्य प्रसंगात नुकसान नाही.झाडेझुडपे तुटण्याचा प्रश्नच नाही. चिपळूण शहरात अतिउच्च दबाची भूमिगत वीज वाहिनी टाकताना कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर, इंफ्राचे शरद परीट, बीएसएनएलचे बापट व इतर अधिकारी उपस्थित होते. चिपळूण शहरातून उच्च दाबाची भूमिगत वीज वाहिनी टाकताना खोदाईचे मोजमाप घेताना इंफ्राचे सहाय्यक अभियंता शरद परीट.