शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात रेशन दुकान तपासणीच्या नावाखाली वसुली, पावती न देता धान्यांवरही डल्ला

By भीमगोंड देसाई | Updated: February 11, 2025 19:09 IST

पुरवठा विभागातील खाबुगिरी : ‘अका’ करवी तक्रारी मॅनेज, ठोस कारवाई नसल्याने दलालीत वाढ

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : रेशन व्यवस्थेत पारदर्शकता येण्यासाठी ऑनलाइन व्यवस्थेमुळे किती रेशनकार्डधारकांनी धान्य घेऊन गेले किती ? शिल्लक आहे किती ? याची सविस्तर माहिती जिल्हा पुरवठा, तालुका पुरवठा प्रशासनास एका क्लिकमध्ये मिळू शकते. पण तालुका कार्यालयातील कर्मचारी ऑपरेटर, खासगी उमेदवाराकरवी दुकान तपासणीचा फार्स करून हप्ता वसुलीच्या तक्रारी आहेत. हप्त्याचे पैसे गोळा करण्यासाठी अपवाद वगळता अनेक दुकानदार रेशनधारकांना पावती न देता धान्यांवर डल्ला मारतात. त्याचे शिल्लक धान्य खुल्या बाजारात विकले जात जात असल्याचेही आरोप होत आहेत.

पुरवठा व्यवस्थेतही खाबुगिरीसाठी शहर, तालुका पातळीवरही तयार झालेले ‘अका’ तक्रारी मॅनेज करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. यामुळेच तक्रारदारालाच हेलपाटे मारावे लागतात. परिणामी दोषी मोकाट राहत आहेत. शहर, करवीर पुरवठा व्यवस्थेत मनोहर, अशोक, निलम, जिल्ह्यात संतोष या दलालांची सध्या चलती आहे. याशिवाय ऑपरेटर, उमेदवारही वसुलीत आघाडीवर आहेत.दलाल म्हणून काम करीत असलेल्या ऑपरेटर यांचे मूळ काम पॉश मशीन दुरुस्त करणे, ऑनलाइन यंत्रणेत मदत करणे असे आहे. पण हेच अनेक पुरवठा कार्यालयात कारभारी बनले आहेत. ते कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर बसून कामकाजही करतात. यावरून त्यांचे अर्थपूर्ण वजन किती प्रभावशाली आहे, हे समोर येत आहे. 

म्हणूनच पुरवठा विभागात बदलीसाठी रस्सीखेचपुरवठा विभागात चांगली वरकमाई असल्याने तिथेच बदली होण्यासाठी महसूलमध्ये प्रत्येक वर्षी जोरदार रस्सीखेच असते. यासाठी त्या परिसरातील आमदार, खासदारांकडूनही मोर्चेबांधणी केली जाते. अशाप्रकारे क्रिम पोष्ट मिळाल्यानंतर पुरवठा कार्यालयात बसून वरकमाईचे उद्योग वाढत असल्याच्या सार्वत्रिक तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी पुरवठा कार्यालयात बसून खासगी उमेदवार, ऑपरेटरच खुलेआम काम करीत असतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांच्यावर कारवाईचे धाडस होत नाही हे विशेष आहे.

भ्रष्टाचार कमी करण्यासाठी..पुरवठा विभागातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी रेशनमधील नाव कमी करणे, वाढवणे, विभाजन करणे, केवायसी करणे, पात्र असणाऱ्यांना नवीन रेशनकार्ड काढणे अशा कामांसाठी गावनिहाय शिबिर आयोजित करावेत, अशी मागणी आहे. पण ही मागणी बेदखल केली जात आहे.

कार्डधारकांना मेसेजदेण्याची सुविधा असावी..धान्य उपलब्धतेचा आणि धान्याचा कोटा घेऊन गेल्याचा मेसेज कार्डधारकांना देण्याची सुविधा असावी, जिल्हा पुरवठा तक्रार निवारण अधिकारी स्वतंत्र असावा, त्यांनी निपक्षपणे, पारदर्शकपणे चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, प्रत्येक स्वस्त धान्य दुकानावर शिल्लक साठा, दर फलक, कार्डसंख्येचा फलक दर्शनी भागात लावण्याची सक्ती करावी, धान्य दिल्यानंतर कार्डधारकांना पावती मिळावी, अशी मागणी रेशन बचाव समितीचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर