शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

माध्यमिकचा ‘चाचा’च ‘कलेक्टर’

By admin | Updated: January 16, 2016 00:14 IST

अधिकाऱ्यांचा आशीर्वाद : सौदा ठरविण्यात आघाडीवर

शिक्षणातील ‘चोर बाजार’भीमगोंडा देसाई -- कोल्हापूरमाध्यमिक शिक्षण विभागातील ‘चाचा’ खाबुगिरीतील कलेक्टर आहे, हे जगजाहीर आहे. लाच घेण्याचा सौदा तेच ठरवितात. आपला वाटा काढून वरिष्ठांपर्यंत प्रामाणिकपणे सहीसलामत पोहोच करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांना आतापर्यंतच्या सर्वच अधिकाऱ्यांचा आशीर्वाद राहिला आहे. कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत साऱ्यांची कुंडली त्यांना माहीत आहे. शासन नियमानुसार कामकाज न चाललेल्या संस्थांवर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार माध्यमिक शिक्षण विभागाला आहे; पण बहुतांशी शिक्षणसंस्था आजी-माजी राजकीय नेत्यांच्या संबंधित असतात. त्यामुळे कारवाई करण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून मलई गोळा केली जाते. कारवाईचा विषय आल्यानंतर कागदोपत्री घोडे नाचवायची व मलई मिळणार असली तर नियम, कायद्यातील पळवाटा शोधून काम करायचे, असा कारभार आहे. लाचेचा दर महिन्याचा लाखोंचा व्यवहार होत असल्याचे बोलले जात आहे. कामापेक्षा ‘लक्ष्मी’ गोळा करण्यात ‘पळा पळा कोण पुढे’ अशीच शर्यत सुरू असते. ‘चाचा’ सांगलीत असताना अनेक कारनामे केले. काळ्याकुट्ट कारकिर्दीमुळे त्यांची उचलबांगडी कोल्हापुरात झाली. त्यांना शासनाचे नियम, कायदे आणि समोरच्या व्यक्तीस गोड बोलून गुंडाळण्याचे उत्तम ज्ञान आहे. अर्थपूर्ण वाटाघाटी करून पैसे ओढण्यात ते ‘चॅम्पियन’ आहेत. त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी येणारे संस्थाचालक, शिक्षक, कर्मचारी प्रेमाने ‘चाचू’ म्हणतात. कोणत्या व्यक्तीस कसे अडचणीत आणायचे, हे माहीत असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही उघड बोलत नाहीत. तक्रार करीत नाहीत. त्यांच्या इशाऱ्यावरच ‘माध्यमिक’चा कारभार चालतो. अधिकाऱ्यांच्या तोंडातही ‘चाचां’चे नाव सतत असते. टिप्पणी, शासनाला माहिती पाठवितानाही अधिकारी त्यांचेच मार्गदर्शन घेतात. भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तालुकानिहाय टक्केवारीवर टोळी कार्यरत केली आहे. अतिरिक्त शिक्षक, कर्मचारी समायोजनेत ‘चाचा’ने आणि संबंधित लिपिक, अधिकाऱ्यांनी चांगला ढपला पाडला आहे. यात अनेकांची लूट झाली असली तरी शिक्षण विभागातील साखळीमुळे सारेच मूग गिळून आहेत. मंत्र्यालाही लाजवेलअसे लग्न..वर्षापूर्वी कोल्हापुरात ‘चाचा’च्या मुलीचे लग्न झाले. लग्नातील जेवण, मंडप, मखमली गालिचा, शाही स्वागतकमान हे सर्व एका मंत्र्याला लाजवेल अशी व्यवस्था होती. त्यावरून ‘चाचा’ची वरकमाई किती असेल, हे स्पष्ट होते.