शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरांत अनधिकृत बांधकामे जोरात--शासकीय नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:12 IST

दक्षिणच्या उपनगरांत शासकीय नियम धाब्यावर बसवत रस्त्यालगत अनधिकृत बांधकामे बिनधास्तपणे जोरात सुरू आहेत. ज्या प्रश्नी कारवाई होतच नाही, अशा बांधकामांना बळ मिळत आहे.

ठळक मुद्दे प्रशासनाचे दुर्लक्ष, पदपथास चिकटून अनेक ठिकाणी कामे

अमर पाटील ।कळंबा : दक्षिणच्या उपनगरांत शासकीय नियम धाब्यावर बसवत रस्त्यालगत अनधिकृत बांधकामे बिनधास्तपणे जोरात सुरू आहेत. ज्या प्रश्नी कारवाई होतच नाही, अशा बांधकामांना बळ मिळत आहे. उपनगरांत वाहतुकीची कोंडी टाळावी, रस्ते अपघातमुक्त राहावेत, यासाठी रस्ता रुंदीकरण करण्यात आले. पादचाऱ्यांची सोय व्हावी, यासाठी मुख्य रस्त्यालगत पदपथ विकसित करण्यात आले. शासकीय नियमान्वये या पदपथापासून साडेचार मीटर खासगी जागेत बांधकाम करता येत नाही; परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून पदपथास लागून बांधकामे सुरू आहेत.

अनधिकृत बांधकामांची व्याप्ती इतकी वाढली आहे की, आरक्षित भूखंड, राखीव भूखंड इतकेच काय नैसर्गिक नालेही अतिक्रमणमुक्त राहिले नाहीत.वाढती लोकसंख्या व प्रशासकीय अधिकाºयांची कमतरता हे कारण प्रशासन नेहमीच पुढे करते. वास्तविक पालिका प्रशासनाच्या नगररचना विभागाने अनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवणे क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२ ते ५५ अन्वये खासगी जागेत अनधिकृत बांधकाम केल्याचे प्रशासनास निदर्शनास आल्यास एक महिन्याच्या मुदतीची नोटीस देणे क्रमप्राप्त आहे. या मुदतीत अनधिकृत बांधकाम न काढल्यास ते पाडण्याची तरतूद आहे; पण कार्यवाही करायची कोणी, हेच अनुत्तरित आहे.

राखीव भूखंडांबाबत पालिकेने लक्ष न देता जाणीवपूर्वक कानाडोळा केला, तर अधिकाºयांनी याप्रश्नी नियमातून अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. परिणामी, हे भूखंड भूमाफियांच्या घशात गेले आहेत. आता यावर अनधिकृत बांधकामे झाल्याचे आरोप आता नवीन राहिले नाहीत. उपनगरांत पालिका हद्दीत खासगी जमीनमालक पालिका प्रशासनास न जुमानता बांधकाम नियमावली धाब्यावर बसवत अनधिकृत बांधकामे करीत आहेत. त्यावर वेळीच कार्यवाही होणे गरजेचे आहे.

खासगी जमीनमालकांनी रस्त्यालगत अनधिकृत शेड, खोल्या बांधून त्या व्यवसायासाठी भाड्याने दिल्या आहेत. पदपथालगत अनधिकृत घरे बांधण्याची लागलेली स्पर्धा पालिका प्रशासनाच्या निदर्शनास का येत नाही? यावर प्रशासन कारवाईचा बडगा उगारत नसल्याने भविष्यात हा प्रश्न जटील बनण्याची शक्यताआहे.भराव टाकून नाल्याची पात्रे वळविलीउपनगरात प्रत्येक प्रभागातून लहान-मोठे नैसर्गिक नाले वाहतात. या नाल्यांच्या पात्रापासून ठराविक अंतरावर बांधकाम करता येत नाही, असे असूनही बºयाच ठिकाणी नाल्यांच्या पात्रात भराव टाकून नाल्यांची पात्रे वळवून अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. याचा परिणाम प्रत्येक पावसाळ्यात दिसून येतो. प्रत्येक पावसाळ्यात किमान शंभरावर कॉलनीतील नागरी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर