शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या आडून अनधिकृत केबिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:42 IST

महापालिका सभेत आरोप : आयुक्तांचे कारवाईचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एकीकडे शहरात वाहने लावायला जागा नाही, तर दुसरीकडे अपंगांना दिल्या जाणाऱ्या केबिनच्या आडून सर्वत्र अनधिकृत केबिनचे जाळे पद्धतशीरपणे वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अपंगांना अनुदान देण्याऐवजी केबिन देण्याची कल्पना कोणाची आहे, अशी विचारणा गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. शहरात गेल्या सहा महिन्यांत ५६० अनधिकृत केबिन बसविल्या गेल्याचे प्रशासनाने मान्य केल्यानंतर नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी मोहीम राबवून या केबिन हटविण्यात येतील, असे आयुक्त अभिजित चौधरी यांनी आश्वासन दिले. अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या. दिव्यांगांना केबिन अथवा अनुदान देण्याची कायद्यात तरतूद आहे. दिव्यांगांना जरुर न्याय द्यायला पाहिजे; परंतु शहरात केबिन लावण्यासाठी जागा नसेल तर त्यांना अनुदान देणे आवश्यक होते. दिव्यांगांच्या आडून अनधिकृत केबिन मोठ्या प्रमाणात वाढत आहेत यावर नगरसेवकांनी प्रकाशझोत टाकला. यापुढे कोणालाही केबिन देऊ नका. अनधिकृत केबिन तातडीने हटवाव्यात यासाठी शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, सुनील कदम, किरण नकाते यांनी आग्रह धरला. महावीर उद्यानाजवळील केबिन हटविण्यात आल्यानंतर आता पुन्हा तेथे केबिन टाकल्या जात आहेत. नेमक्या कोण या केबिन बसवत आहे. यातील अधिकृत कोण आणि अनधिकृत कोण याची प्रशासनाने शहानिशा करावी, अशी मागणी राहुल चव्हाण यांनी केली. विजय सूर्यवंशी यांनी अनधिकृत केबिनवर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. यातच नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी संपूर्ण शहरात ५६० केबिन अनधिकृत असल्याची माहिती दिली. त्यावर सर्वांनीच मोहीम राबवून या केबिन हटवा, कोणी नगरसेवक कारवाईच्या आडवा आला तर त्याचे नावे जाहीर करून कारवाई करा, असेही नगरसेवकांनी सुचविले. ‘केएसबीपी’सह इतरांचाही विचार करावा शहरातील सर्व चौक व रस्ते सुशोभीकरण करण्याकरिता ‘केएसबीपी’या अशासकीय संस्थेबरोबर करार करण्यास परवानगी मागण्याच्या प्रस्तावास शारंगधर देशमुख यांनी जोरदार हरकत घेतली. एकाच संस्थेला काम देण्याऐवजी अन्य कोणी संस्था काम करण्यास इच्छुक असल्यास त्यांनाही संधी दिली जावी, अशी सूचना केली. महापौर फरास यांनी या संस्थेचे काम चांगले आहे, चौक सुशोभीकरणासह त्याची देखभालसुद्धा संस्थाच करणार आहे, त्यामुळे त्यांचा आधी विचार करूया, असे स्पष्ट केले. अखेर मूळ प्रस्ताव उपसूचनेसह मंजूर केला.