शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उदगावकरांच्या पाचवीला कचराच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:05 IST

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील गावाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचून राहिले आहेत. वांरवार नागरिकांमधून कचरा उठाव करण्याची मागणी केली जाते. मात्र, ग्रामपंचायतीकडून नागरिकांना फक्त आश्वासन मिळत असल्याने उदगावचे नागरिक कचरा व दुर्गंधीला त्रासले असून, उदगावकरांच्या पाचवीला कचराच कचरा राहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा ...

संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील गावाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचून राहिले आहेत. वांरवार नागरिकांमधून कचरा उठाव करण्याची मागणी केली जाते. मात्र, ग्रामपंचायतीकडून नागरिकांना फक्त आश्वासन मिळत असल्याने उदगावचे नागरिक कचरा व दुर्गंधीला त्रासले असून, उदगावकरांच्या पाचवीला कचराच कचरा राहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ओळखून तत्काळ प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.जयसिंगपूर शहरालगत व सांगली-कोल्हापूर माहामार्गावरील सुमारे २२ हजारांवर लोकसंख्या असलेल्या उदगावचा वाढत्या उपनगरांमुळे मोठ्या प्रमाणात विस्तार वाढला आहे. त्यामुळे गावातील प्रत्येक गल्लीची स्वच्छता तीन ते चार महिन्यांतून किंवा नागरिकांचा मोर्चा आल्यावर केली जाते. तर गेल्या वर्षभरापासून गावातील अनेक चौकांत कचºयाचे ढीग तब्बल दोन ते तीन महिने पडून राहत आहेत. त्यामुळे गावातील अनेक प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.नागरिकांतून वारंवार ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींना कचºयाबाबत सांगितले जाते. मात्र, कमी कर्मचाºयांचे कारण सांगून कचºयाकडे दुर्लक्ष केल्यानेच कचरा प्रश्न वारंवार समोर येत आहे. तर शुक्रवारी दलित समाजाच्यावतीने ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून ग्रामविकास अधिकाºयांना महिलांनी घेराव घातल्यानंतर दलित वस्तीतील कचरा काढण्यास सुरुवात झाली. मात्र, प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी जर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढल्यानंतर स्वच्छता केली जात असेल, तर ग्रामपंचायत काय काम करीत आहे? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.चिंचवाड, जयसिंगपूर, उमळवाड, रेल्वे स्टेशन, सांगली, नदीवेस, काळम्मावाडी, फकीर रस्ता, गावठाण तलाव यांसह परिसरातील रस्त्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचºयाचे ढीग साचून राहिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.