शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

उदयसिंगराव गायकवाड पंचत्वात विलीन

By admin | Updated: December 4, 2014 00:49 IST

साश्रुनयनांनी निरोप : अंत्ययात्रेला गर्दी; आज सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

 कोल्हापूर : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार व राज्याचे माजी मंत्री उदयसिंगराव गायकवाड यांच्यावर आज, बुधवारी सकाळी पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ताराबाई पार्क येथील निवासस्थानापासून काढलेल्या अंत्ययात्रेला त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्रपरिवारासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गेले काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असल्याने गायकवाड यांच्यावर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे काल, मंगळवारी दुपारी निधन झाले. ताराबाई पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी आज, बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. येथे त्यांचे पुत्र मानसिंगराव गायकवाड, नातू रणवीरसिंह गायकवाड, कर्णसिंह गायकवाड, मुलगी डॉ. शर्मिला राणे, निर्मला देशमुख, ऊर्मिला घाटगे, जावई माजी आमदार हर्षवर्धन देशमुख, विजय घाटगे, आदींसह कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्रपरिवारासह, राजकीय, सामाजिक, उद्योग, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. मनमिळावू स्वभाव, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व यांमुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा असल्याने निवासस्थानासमोर अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली होती. यानंतर निवासस्थानापासून सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सिंचन भवन चौक, आदित्य कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय, खानविलकर पेट्रोल पंप, सीपीआर चौक, टाउन हॉलमार्गे पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्ययात्रा आली. या ठिकाणीही त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. पन्हाळ्याचे प्रांताधिकारी रवींद्र खाडे, करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे, शाहूवाडीचे तहसीलदार हृषीकेश शेळके यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुष्पचक्र वाहिले. यानंतर माजी खासदार गायकवाड यांचे पुत्र मानसिंगराव गायकवाड यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापौर तृप्ती माळवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील, आमदार महादेवराव महाडिक, आमदार अमल महाडिक, सत्यजित पाटील-सरुडकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा), माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, प्रकाश आवाडे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने, माजी आमदार बजरंग देसाई, के. पी. पाटील, दिनकरराव जाधव, बाबासाहेब पाटील-सरुडकर, संजय घाटगे, सुरेश साळोखे, ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय डी. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, शाहू दूध संघाचे समरजितसिंह घाटगे, प्रवीणसिंह घाटगे, मृगनयनाराजे घाटगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, जिल्हा परिषदेचे सदस्य ए. वाय. पाटील, अरुण इंगवले, योगीराज गायकवाड, ‘गोकुळ’चे संचालक अरुणकुमार डोंगळे, रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, कर्नल विजयसिंह गायकवाड, माजी महापौर महादेवराव आडगुळे, आर. के. पोवार, शिवाजीराव कदम, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. सुरेश कुराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, भाकपचे कॉ. दिलीप पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, किरणसिंह पाटील-येवतीकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, करवीर तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, संचालक अशोकराव पवार-पाटील, प्रताप कोंडेकर, अमरीश घाटगे, उदय गायकवाड, एस. के. माळी, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, भैयासाहेब कुपेकर, संग्रामसिंह कुपेकर, अमरसिंह पाटील, शंकरराव पाटील-शिंगणापूरकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, कृष्णराव सोळंकी, पै. दादू चौगले, विनोद चौगले, विष्णू जोशीलकर, बाळ गायकवाड, बाळ पाटणकर, ऋतुराज इंगळे, बाजीराव कांबळे, आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले.