राज्य व देशात अनेकजण शेतकरी कल्याणाबाबत काम करत असतीलही, मात्र शेतकरीहिताचा विचार करून तो अंमलात आणण्याचे काम काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार पी. एन. पाटील हेच करू शकतात, हे जिल्ह्याला दाखवून दिले आहे. तीस वर्षांच्या राजकीय प्रवासात शेतकरी व सामान्य माणूस केंद्रबिंदू मानूनच त्यांनी काम केले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून अल्प व्याजाने कर्जपुरवठा असेल किंवा तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्जपुरवठा असेल. त्याशिवाय विधिमंडळात सरसकट कर्जमाफीची मागणी करणारे पी. एन. पाटील हे पहिले आमदार आहेत.
साहेबांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या ‘गोकुळ’ने तर सामान्य दूध उत्पादकांच्या जीवनात क्रांती केली. कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली असताना, ग्रामीण भागाचे अर्थकारण केवळ ‘गोकुळ’मुळे सुरू राहिले, हे कोणालाही नाकारता येणार नाही. ज्या संस्थेत ते काम करतात, तिथे आपल्या कामाची छाप पाडतात.
राजकीय जीवनात वावरत असताना साहेबांनी कधी विरोधकांचा द्वेष केला नाही. निवडणुकीच्या रणांगणात ताकदीने लढाई करतील, मात्र त्यानंतर मतदारसंघात केवळ विकास हेच ध्येय ठेवून काम केले. त्यामुळेच विरोधकांमध्येही त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर इतकी वर्षे कोणाची पकड राहिली नाही. आपल्या कामातून आणि काँग्रेस पक्षावरील निष्ठेतून त्यांनी पक्षात आदराचे स्थान तर निर्माण केलेच, त्याचबरोबर जिल्ह्याच्या राजकारणातही साहेबांच्या शब्दाला वजन निर्माण झाले. अशा कर्तृत्ववान व निष्ठावंत नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो....!
- उदयसिंह पाटील-काैलवकर
(व्हा. चेअरमन, भोगावती साखर कारखाना)
कोरोना काळात जनतेच्या मदतीला
सात-आठ महिने कोरोनाच्या महामारीत सामान्य माणूस घाबरून गेला होता. त्याला आधार देत एक लाख सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप आमदार पी. एन. पाटील यांनी केले. कोरोनाबाधित रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी दिवस-रात्र त्यांनी प्रयत्न केले.
(शब्दांकन : सुनील चौगले)