शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भावांनो..! फुटबॉल हवा की हाणामारी?, कोल्हापुरात खेळातील ईर्षा चुकीच्या दिशेने; विचार करण्याची गरज

By भारत चव्हाण | Updated: January 30, 2023 15:54 IST

मैदानावरील वाद, भांडणे हा आता नेहमीचा प्रकार

भारत चव्हाण कोल्हापूर : कोल्हापूरचाफुटबॉल खेळ बहरला पाहिजे, देशपातळीवर कोल्हापूरचे नाव झाले पाहिजे, येथील खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, खेळाडूंचे याच खेळात करिअर घडले पाहिजे, अशी सगळ्यांचीच भावना आहे; पण वारंवार मैदानावर प्रेक्षकांत होणारी हुल्लडबाजी, खेळाडू, समर्थकांत होणारी हाणामारी, मैदानावरील चप्पल, बाटल्याची फेकाफेकीचे प्रकार पाहता तमाम शौकिनांच्या भावनांना छेद देण्याचे प्रकार घडत आहेत, म्हणून फुटबॉल खेळच बंद करूया का, असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करू लागला आहे.एकदा दोनदा नव्हे अनेक वेळा फुटबॉलच्या मैदानावर होणारी हुल्लडबाजी, पेठा पेठातील अनावश्यक ईर्षा, फालतून अभिमान, प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या चांगल्या खेळाच्रूा कौतुकाऐवजी त्याचा द्वेश करण्यावृत्ती या प्रकारांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.पोलिस प्रशासनाने दखल घेऊन समजावण्याचा, एकोपा ठेवण्याचा प्रयत्न केला. शाहू छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती यांनी प्रतिस्पर्धी संघ व समर्थकांत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला. खेळाच्या विकासासाठी, खेळाडूंच्या करिअरसाठी एवढे सगळे प्रयत्न होऊनही जर ‘पालथ्या घागरीवर पाणी’ पडणार असेल तर मग फुटबॉल स्पर्धा तरी का आणि कशासाठी भरवायच्या, असा उद्विग्न सवाल शौकिनातून विचारला जात आहे.मैदानावरील वाद, भांडणे हा आता नेहमीचा प्रकार झाला आहे. मान्यवरांच्या प्रयत्नामुळे वादावर पडदा टाकायचा, त्यानंतर शंभर दीडशे पोलिसांच्या बंदोबस्तात सामने घ्यायचे. थोडेच दिवस सामने सुरळीत झाले की मग पुन्हा वाद, ईर्षा, दगडफेक, हुल्लडबाजी असा अनुभव येत आहे. खेळाडू आचारसंहिता पाळणार नाहीत, समर्थक निरर्थक अभिमान सोडून देणार नसतील तर मग सामने भरविणे बंद करावेत किंवा याबाबतीत संबंधितांच्या विरोधात कडक भूमिका घ्यावी. अन्यथा हे प्रकार थांबणार नाहीत, उलट पेठापेठात द्वेष वाढतच राहणार आहे.

काय करायला पाहिजे?

  • सुसंवाद वाढविण्याचा प्रयत्न करून कोणी ऐकत नसेल तर कडक धोरण स्वीकारणे अपरिहार्य.
  • खेळाडू आचारसंहिता पाळणार नसतील तर त्यांच्यावर ठोस कारवाई करायला पाहिजे.
  • खेळाडूंनी हाणामारीला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले तर त्या खेळाडूवर बंदी घातली पाहिजे.
  • संघ, खेळाडूंवर कारवाई करताना संबंधित पंच, केएसए यांनी दुजाभाव करता कामा नये.
  • मैदानाच्या बाहेर उमटणाऱ्या घटनांची नोंद घेऊन पोलिसांनी कडक कारवाई करावी.
  • केएसए, पंच यांची भूमिका नि:संशय ठेवण्याचा प्रयत्न व्हावा.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल