शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दोन गडी कोल्हापुरी, सायकलने दिल्ली व्दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 11:17 IST

सायकलव्दारे 2 हजार किलो मीटर प्रवास करून आनंदी जीवनाचा संदेश देत कोल्हापूरातील आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे या दोन तरूणांनी दोन गडी कोल्हापुरी हा हॅशटॅग घेऊन दिल्ली गाठली आहे.

ठळक मुद्देदोन गडी कोल्हापुरी, सायकलने दिल्ली व्दारीआकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे यांचा 2 हजार किलो मीटर प्रवास

कोल्हापूर : सायकलव्दारे 2 हजार किलो मीटर प्रवास करून आनंदी जीवनाचा संदेश देत कोल्हापूरातील आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे या दोन तरूणांनी दोन गडी कोल्हापुरी हा हॅशटॅग घेऊन दिल्ली गाठली आहे.या तरूणांनी दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी आकाश आणि अनिकेत यांच्या उत्साह वाढवित पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधीत 26 जानेवारीपुर्वी दिल्लीत येण्याचा संकल्प आकाश आणि अनिकेत यांनी केला होता, तो त्यांनी वेळच्या आताच पुर्ण केला. आनंदी जीवनाचा संदेश देत हा प्रवास केला असून प्रवासातही आनंद मिळाल्याचा अनुभव आकाश आणि अनिकेत यांना आला.2 जानेवारीपासून सुरू झालेला प्रवास दिल्लीत 23 जानेवारीला संपला. हा प्रवास मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरीयाणा या राज्यांमधून झाला असल्यामुळे आपला भारत देश हा किती वैविध्यपुर्ण आहे याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव घेता आला असल्याचे आकाश आणि अनिकेत यांनी सांगितले.या तरूणांनी 12 किलो वजन घेऊन हा प्रवास केला असून, या दरम्यान कमीतकमी साहित्य वापरून कस जगता येते याचाही अनुभव आकाश आणि अनिकेत यांना आला. सोबतच रात्रीचे वास्तव्यासाठी मंदिर, मश्चिद, गुरूव्दारा अशा धार्मिक ठिकाणीच थांबले असल्यामुळे त्या-त्या भागातील संस्कृती, भाषा समजली आणि खादयपदार्थांचा आस्वाद त्यांनी घेतला.फेसबूकच्या माध्यमातून जोडलेले पण कधीही भेट न झालेले आभासी मित्रांचे रियल वास्तव्य या प्रवासामुळे कळले. आभासी जगातील मित्र हे आभासी नसुन खरेच असतात हा विश्वास दृढ झाला. फेसबूकवरील मित्रांनी या संपुर्ण प्रवासाचा खर्च उचलला हे विशेष, असल्याचे आकाश यांनी सांगितले.फिरस्त्यांना जात, धर्म नसतो, त्यांच्याकडे माणुस म्हणुनच बघितले जात असल्यामुळे माणुसपण किती मोठे आहे हे या प्रवासामुळे शिकता आल्याने विचारांची समृध्दता अधिक वृध्दीगंत झाली, असल्याच्या भावना आकाश आणि अनिकेत यांनी व्यक्त केल्या. सायकल प्रवासाचा पुढील टप्पा हा कोकणाचा असणार आहे. लवकरच हा प्रवास सुरू करणार असल्याचे आकाश आणि अनिकेत यांनी सांगितले.

टॅग्स :bycycle rallyसायकल रॅलीdelhiदिल्लीkolhapurकोल्हापूर