शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या हल्ल्यात २ महिला जागीच ठार

By admin | Updated: December 14, 2014 00:41 IST

बेळंकीत वाटमारी : अन्य तीन महिलांनाही लुटले; लाखाचा ऐवज लंपास

मिरज : यल्लम्मा देवीची यात्रा आटोपून परतणाऱ्या महिलांवर दोन चोरट्यांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात दोन महिला जागीच ठार झाल्या. या दोन महिलांसह त्यांच्यासोबत असणाऱ्या अन्य तीन महिलांच्या अंगावरील दागिने घेऊन चोरट्यांनी पलायन केले. सुमारे एक लाखाचा हा ऐवज असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील बेळंकी येथील गायकवाड वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज, शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लूटमारीचा हा प्रकार घडला.सुनीता महादेव गायकवाड (वय ३५, रा. बेळंकी, ता. मिरज), मंगल सुधाकर घेवारे (४५, रा. कृष्णा घाट, मिरज) अशी मृत महिलांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने मिरज तालुक्यात खळबळ उडाली आहे.बेळंकीत शुक्रवारपासून यल्लम्मा देवीची यात्रा सुरू आहे. यात्रेनिमित्त भाविकांची व महिलांची मोठी गर्दी आहे. बेळंकीतील गायकवाड वस्तीवरील महिला शनिवारी रात्री देवीच्या दर्शनाला यात्रेस गेल्या होत्या. तेथून सुनीता गायकवाड, मंगल घेवारे, दीपाली गायकवाड, शकुंतला गायकवाड, कालिंदी गायकवाड या पाच जणी घरी गायकवाड वस्तीवर परतत होत्या. बेळंकी-आरळीहट्टी रस्त्यावरून नामदेव कांबळे यांच्या शेताजवळून जात असताना वाटेत अंधारात दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी अडविले. चोरट्यांनी हातातील धारदार चाकूचा धाक दाखवून या सर्व महिलांना अंगावरील दागिने काढून देण्यास सांगितले. यावेळी दीपाली, शकुंतला, कालिंदी गायकवाड या तिघींनी घाबरून गळ््यातील व कानांतील दागिने काढून चोरट्यांना दिले. मात्र, सुनीता गायकवाड व मंगल घेवारी या दोघींनी दागिने देण्यास नकार दिला. यावेळी चोरट्यांनी या दोघींच्या पोटात, पाठीवर व छातीवर चाकूने सपासप वार केले. त्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन या दोघी रक्ताच्या थारोळ््यात कोसळल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. चोरट्यांनी या दोघींच्या अंगावरील दागिने हिसकावून घेऊन अंधारात पलायन केले. या दोघींवर हल्ला होत असताना इतर तिघींनी आरडाओरडा केला. मात्र, निर्जन ठिकाणी ही घटना घडली असल्याने त्यांना लवकर मदत मिळू शकली नाही. या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस निरीक्षक एस. के. सोनावणे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिसरातील सगळ््या रस्त्यांची नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु हल्लेखोर सापडले नाहीत. हल्लेखोरांनी या पाचही महिलांचे चार तोळे दागिने लुटले. या दागिन्यांची एक लाख रुपये किंमत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस हल्लेखोरांचा शोध करीत होते. चोरटे कर्नाटकातून आल्याचा अंदाजबेळंकी येथे यल्लम्मादेवीची यात्रा आटोपून परतणाऱ्या महिलांना लुटल्याचे आणि त्यातील दोन महिलांना चोरट्यांनी ठार केल्याचे समजताच जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेने तातडीने सर्वत्र नाकाबंदी केली असून, चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. हे चोरटे नजीकच्या कर्नाटकातून आले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.नकली दागिनेही लुटले- यात्रेहून परतणाऱ्या महिला या गरीब कुटुंबातील होत्या. त्यातील एका महिलेच्या अंगावर नकली दागिने होते. तेही चोरट्यांनी लुटून नेले. - चोरटे दोघींवर धारदार शस्त्राने वार करीत असताना अन्य तिघी आरडाओरडा करीत होत्या. मात्र, परिसर निर्जन असल्याने त्यांचा आवाज हवेतच विरला. ग्रामीण भागातील पहिलाच प्रकारवाटमारी करणाऱ्या चोरट्यांकडून दोन महिलांना ठार केले जाण्याची ही घटना मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच घडली आहे. (प्रतिनिधी)