शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार कोटी रूपयांच्या नोटा जमा!

By admin | Updated: November 13, 2016 01:11 IST

इतक्या नोटा ठेवायच्या कोठे ?: सातारा, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा बँकांसमोर प्रश्न

सातारा/रत्नागिरी : पाचशे अन् हजारांच्या नोटा रद्द झाल्यानंतर बँकांमध्ये उसळलेली गर्दी तिसऱ्या दिवशीही कायमच होती. गेल्या तीन दिवसांत सातारा जिल्ह्यातील बँकांमध्ये सुमारे एक हजार कोटीच्या रद्द नोटा जमा झाल्या आहेत. अशीच स्थिती सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. या दोन जिल्ह्यांतील बँकामध्येही एक हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. बँकांत असलेल्या जागांमध्ये या नोटा ठेवायच्या कशा, सांभाळायच्या कशा, असा प्रश्न बँकांसमोर उभा आहे. नोटा रिझर्व्ह बँकेकडून परत नेल्या जाणार आहेत. मात्र, देशभरात नव्या नोटांचे तसेच चलनातील इतर नोटांचे वितरण करण्याचे रिझर्व्ह बँकेचे काम वाढलेले असल्याने जुन्या नोटा परत जाण्याला अजून कालावधी लागू शकतो, अशी माहिती पुढे येत आहे. मात्र तोपर्यंत आधीच नोटांचा प्रश्न मर्यादांसमोर उभा राहिला आहे.सातारा जिल्ह्यात सरकारी, सहकारी, खासगी अन् ग्रामीण अशा एकूण ३३ बँकांच्या ५४८ शाखा कार्यरत आहेत. पहिल्या दोन दिवसांमध्ये ‘बँक आॅफ महाराष्ट्र’च्या ६२ शाखांमध्ये ६० कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महादेव शिराळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.भारतीय स्टेट बँकेच्या प्रतापगंज पेठ शाखेत एका दिवसात १६ कोटींच्या नोटा जमा होण्याची विक्रमी घटना घडली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण ३१३ शाखांमध्ये एका दिवसात दीडशे कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्याची माहिती प्रभारी सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातही पाचशे आणि एक हजार रुपयांच्या रद्द नोटा बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी लागलेली लोकांची रीघ तिसऱ्या दिवशीही कायम होती. तीन दिवसांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये मिळून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. ‘एटीएम’मध्ये भरण्यासाठी १00 रुपयांच्या व काही प्रमाणात दोन हजार रुपयांच्या नोटाही जिल्ह्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)कर्मचारी व्यस्त : काऊंटरची वेळ रविवारीही जास्तया बँकेच्या एखाद्या शाखेची महिनाभराची उलाढाल जेवढी असते, तेवढी रक्कम केवळ तीन दिवसांमध्ये मोजण्यात सर्व बँक कर्मचारी व्यस्त झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. रांगेत उभारून बँकेत जमा केलेल्या नोटांची ही आकडेवारी आहे.खातेदारांच्या सोयीसाठी तीन वाजता बंद होणारा देवघेव व्यवहार सध्या साडेपाच, सहा वाजेपर्यंत सुरू आहे. रविवारीही तो उशिरापर्यंतच सुरू ठेवला जाणार आहे.