शहरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या ५५ वर गेली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्याधिकारी जाधव यांनी लॉकडाऊन कडक केली आहे. त्यासाठी पोलिसांची मदत घेऊन संयुक्त कारवाई केली जात आहे. सकाळी सात ते अकरा अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्याने त्यानंतरही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांवर दंडात्मक, तर काहीवेळा दुकाने सील करण्यात येत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावरून गस्त घालण्यात येत असून विनाकारण फिरणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
गुरुवारी दुपारी दुकान सुरू करून लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याने दत्त फूटवेअर आणि अरिहंत इलेक्ट्रॉनिक दुकान सील केल्याने या कारवाईची व्यावसायिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
फोटो - २९०४२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे दुकाने सुरू ठेवल्याने पालिका कर्मचारी व पोलिसांनी दुकाने सील केले. यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील उपस्थित होते.