शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉवर दहा रुपयाला दोन गड्डे, कडधान्य स्थिर : उष्मा वाढल्याने लिंबूच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 13:30 IST

vegetable Market Kolhapur- भाजीपाल्याच्या दरात फारशी चढ-उतार दिसत नसली तरी प्लॉवर दहा रुपयाला दोन गड्डे झाले आहेत. वांगी, दोडका, गवार, भेंडी, कारली या प्रमुख भाज्यांच्या दर स्थिर असून मेथीची पेंढी वीस रुपयाला तीन आहेत. कडधान्य मार्केट काहीसे शांत झाले आहे. सरकी तेलाचे दर १४५ रुपये किलोवर स्थिर असून साखर ३५ रुपये किलोवर आहे.

ठळक मुद्देप्लॉवर दहा रुपयाला दोन गड्डे, कडधान्य स्थिर उष्मा वाढल्याने लिंबूच्या दरात वाढ

कोल्हापूर : भाजीपाल्याच्या दरात फारशी चढ-उतार दिसत नसली तरी प्लॉवर दहा रुपयाला दोन गड्डे झाले आहेत. वांगी, दोडका, गवार, भेंडी, कारली या प्रमुख भाज्यांच्या दर स्थिर असून मेथीची पेंढी वीस रुपयाला तीन आहेत. कडधान्य मार्केट काहीसे शांत झाले आहे. सरकी तेलाचे दर १४५ रुपये किलोवर स्थिर असून साखर ३५ रुपये किलोवर आहे.स्थानिक भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने दरात काहीसी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात फारशी चढ-उतार दिसत नसली तरी घाऊक बाजारात कोबी ३, वांगी दहा, टोमॅटो साडेसहा रुपये, ढब्बू पंधरा, रुपये किलो आहे. ओला वाटाणा व गवारचे दर काहीसे तेजीत आहेत.

कोल्हापूरबाजार समितीत कोथंबीरची आवक ५८ हजार ५५० पेंढ्यांची रोज होत आहे. त्यामुळे दर घसरले आहेत. घाऊक बाजारात चार रुपये पेंढीचा दर असून किरकोळ बाजारात दहा रुपये आहे. मेथी, पालक, पोकळ्याची आवकही चांगली असल्याने मेथी वीस रुपयाला तीन पेंढ्या आहेत. टोमॅटोला वीस रुपयाला दीड किलो दर आहे.फळ मार्केटमध्ये द्राक्षे, कलिंगडे, सफरचंदची आवक चांगली आहे. काळ्या पाठीच्या कलिंगडेची आवक जास्त असून किरकोळ बाजारात दहा रुपये दर आहे. सरकी तेल १४५ रूपये किलोवर स्थिर आहे. डाळीच्या दरात फरक झालेला नाही.हापूसची आवक वाढलीहापूस आंब्याची आवक हळूहळू वाढू लागली आहे. कोल्हापूर बाजार समितीत पाच हजार बॉक्सची आवक होत असून सरासरी ३५० रुपये बॉक्सचा दर आहे.कांदा, बटाटा स्थिरकांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यापेक्षा किलोमागे दोन रुपये कमी झाले आहेत. घाऊक बाजारात सरासरी अकरा रुपये किलो दर आहे. बटाट्याच्या दरातही फारशी चढ-उतार दिसत नाही.भाज्यांचे घाऊक बाजारातील किलोचे दर असे-कोबी- ३, वांगी -१०, टोमॅटो -६.५०, ढब्बू -१५, गवार -३२.५०, ओला वाटाणा -३७.५०, कारली-२५, भेंडी-२२.५०, वरणा-२५, दोडका -२०. 

टॅग्स :vegetableभाज्याkolhapurकोल्हापूरMarketबाजार