शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

‘स्वाईन फ्लू’ने दोन रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 21:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क,कोल्हापूर : हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढू लागल्याने बुधवारी दोन स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रघुनाथ महादेव सावंत (वय ६६, रा. दापोली, जि. रत्नागिरी) व लता कुसरेजा (४७, रा. गांधीनगर) अशी मृतांची नावे आहेत. एकाच दिवशी स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासन खडबडले आहे. ...

ठळक मुद्दे♦मृत रत्नागिरी, गांधीनगरातील, आरोग्य यंत्रणा खडबडली♦जिल्'ात १९ रुग्णांवर उपचार सुरू;♦उर्वरित ५० रुग्णांपैकी ३८ जणांना डिस्चार्ज

लोकमत न्यूज नेटवर्क,कोल्हापूर : हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढू लागल्याने बुधवारी दोन स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रघुनाथ महादेव सावंत (वय ६६, रा. दापोली, जि. रत्नागिरी) व लता कुसरेजा (४७, रा. गांधीनगर) अशी मृतांची नावे आहेत. एकाच दिवशी स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासन खडबडले आहे. त्यामुळे जानेवारी २०१७ नंतर जिल्'ात ‘स्वाईन’ने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १५ पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, बुधवारी जिल्'ातील शासकीय रुग्णालयात ‘स्वाईन’चे एकूण १९ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी ८ रुग्ण हे सीपीआरमध्ये दाखल आहेत.बुधवारी मृत्यू झालेल्यांतील रघुनाथ सावंत यांना दि. १६ जुलैला उपचारासाठी सीपीआर रग्णालयात दाखल केले होते. २० जूननंतर त्यांच्यात ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांना सीपीआरमधील ‘स्वाईन’च्या विशेष कक्षात स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या रक्त तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर ‘स्वाईन’ प्रतिकार करणारे औषधोपचार सुरू होते; पण बुधवारी त्यांचा मृत्यू झाला तर दुसरे लता कुसरेजा या महिलेतही स्वाईनसदृश लक्षणे दिसू लागल्याने त्यांना २० जुलैपासून शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांच्याही रक्ताची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांचाही बुधवारी मृत्यू झाला.ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पाऊस आणि ऊन या दोन हवामानातील बदलांमुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग झपाट्याने वाढतो. या बदलत्या वातावरणामुळे विशेषत: ग्रामीण भागात संख्या लक्षणीय दिसत आहे. प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्षानंतर आजार बळावल्यावर रुग्ण गंभीर अवस्थेत सीपीआरकडे येत असल्याचे दिसत आहे.सध्या जिल्'ात ‘स्वाईन’चे एकूण १९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये १२ पॉझिटिव्ह तर ७ संशयित रुग्ण आहेत. बुधवारी पॉझिटिव्ह ३ तर ५ संशयित रुग्णांची वाढ झाली, असून ते सीपीआरमध्ये उपचार घेत आहेत. या पॉझिटिव्ह तीन रुग्णांपैकी २ कोल्हापूर शहरातील तर १ रुग्ण हा सांगली शहरातील आहे तर आठ रुग्णांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आलाआतापर्यंत १५१ रुग्णांवर उपचारजानेवारीपासून आतापर्यंत १५१ स्वाईन फ्लूची लक्षणे असणाºया रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये ६५ पॉझिटिव्ह होते, तर उर्वरित ५० रुग्णांपैकी ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १२ जणांवर अद्याप उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने माहिती दिली.दक्षता घ्या..नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी टाळणे. सर्दी व खोकला आल्यावर तोंडावर रूमाल लावणे, थंडी, ताप, अशक्तपणा, स्नायूदुखी, उलटी, मळमळ अशी ‘स्वाईन’ची लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्यास ‘स्वाईन’चा संसर्ग रोखता येतो.१५ पैकी ८ मृत कोल्हापूर जिल्'ातीलगेल्या सात महिन्यांत ‘स्वाईन’मुळे जिल्'ात १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ८ रुग्ण हे कोल्हापूर जिल्'ातील इतर ७ रुग्ण हे कर्नाटक, सांगली, रत्नागिरी या जिल्'ांतील असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.