शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

आणखी दोन पेट्रोल पंपांची तपासणी

By admin | Updated: June 24, 2017 00:46 IST

नाशिक : इंधनाची चोरी करणाऱ्या ग्रामीण भागातील दोन पेट्रोलपंप सील केल्यानंतर ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री शहरातील एक व घोटी येथील एक अशा दोन पेट्रोलपंपाची संशयावरून तपासणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘डोनेशन घेणाऱ्या शिक्षण संस्था बंद करा’, ‘फी वाढ रद्द झालीच पाहिजे’, अशा घोषणा देत डोनेशन, फी वाढीविरोधात शिवसेनेने शुक्रवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांना दिले.सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवसेना, युवा सेनेचे जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक हे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जमले. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारात त्यांनी निदर्शने केली. ‘पालकांना लुटणाऱ्या शिक्षणसम्राटांचा धिक्कार असो’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’, अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.त्यानंतर त्यांनी शिक्षण उपसंचालक गोंधळी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. शिवाय आंदोलनकर्त्यांनी शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांनी केलेली शुल्कवाढ, त्यांच्याकडून होणारी डोनेशनची मागणी, प्रवेश अर्जासाठी आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क, आदींबाबतच्या तक्रारी मांडल्या. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवरील प्रवेश प्रक्रियेबाबत पालक, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली. यावर शिक्षण उपसंचालक गोंधळी यांनी आठ ते दहा दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी टी. एल. मोळे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी बी. एस. कासार, महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी पी. एस. सुर्वे, शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार आदी उपस्थित होते.आंदोलनात शिवसेनेचे सुनील जाधव, तुकाराम साळोखे, पद्माकर कापसे, किशोर घाटगे, रणजित जाधव, पूजा भोर, रूपाली कवाळे, युवा सेनेचे शहरप्रमुख चेतन शिंदे, अविनाश कामते, पीयूष चव्हाण, आदींसह पालक, विद्यार्थी सहभागी झाले होते.