शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

पैशांचा पाऊसप्रकरणी आणखी दोघांना अटक

By admin | Updated: October 20, 2015 00:15 IST

चार दिवस कोठडी : फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

इचलकरंजी : जादुटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. शांताराम सोमा गोताड (वय ४४, रा. आसरानगर) व श्रीकांत प्रकाश केसेकर (३२, रा. जवाहरनगर) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना सोमवारी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शांताराम व श्रीकांत हे दोघेजण गरजू महिलांना हेरून त्यांना पैशाचे आमिष दाखवून आम्ही पैशांचा पाऊस पाडतो, अशी बतावणी करून महिलांची दिशाभूल करीत होते. यामध्ये फसगत झालेल्या महिलांना टोळीचा म्होरक्या भोंदूबाबा भीमराव शिंदे याच्याशी भेट घालून देत होते, अशी या दोघांची या प्रकरणात भूमिका असल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत या प्रकरणात पाचजणांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी टोळीचा म्होरक्या भीमराव शिंदे याचा मृत्यू झाला असून, सुरेश स्वामी, हणमंत राऊत, शांताराम गोताड आणि श्रीकांत केसेकर हे पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांतून वर्तविली जात आहे. (वार्ताहर)टोळीतील आणखी एकजण रुग्णालयात दाखलसोमवारी अटक केलेल्या गोताड व केसेकर यातील शांताराम गोताड याला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने पोलिसांनी उपचारांसाठी तत्काळ आयजीएम रुग्णालयामध्ये दाखल केले. दरम्यान, याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता गोताड याला शुगर, बीपीचा त्रास असल्यामुळे त्याचा कार्डिओग्राम काढण्यात आला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.प्राथमिक बैठकीचे फुटेज ताब्यातशुक्रवारी पैशांचा पाऊस पाडण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यासाठी शहरातील मध्यवर्ती हॉटेलमध्ये पोलिसांनी सापळा लावलेल्या महिलांशी चर्चा करण्यासाठी बसलेल्या या टोळीच्या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.