मसूदमाले येथील अस्वल खडी नावाच्या शेतात प्रताप गणपती पाटील आणि त्यांचे कुटुंब शेतकरी काम करत असताना दोन लहान बिबट्याची पिल्ले खेळताना निदर्शनास आली. प्रज्ज्वल पाटील या युवकाने त्यांचा व्हिडीओ केला व सोशल मीडियावर व्हायरल केला. पन्हाळा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात दिवसभर शोध मोहीम राबवली. बिबट्याचे ठसे मिळतात का, याचा प्रयत्न केला पण माळरान असलेने ठसे मिळून आले नाहीत. आमच्या शेतात दोन बिबट्याची पिल्ले खेळताना दिसली. ती थोड्या वेळाने जंगलाच्या दिशेने निघून गेली. त्याचा मी व्हिडीओ केला असल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रज्ज्वल पाटील यांनी सांगितले. व्हायरल झालेला व्हिडीओ आम्ही प्रत्यक्ष जाऊन जागेची पाहणी केली असता बिबट्याचे आहे हे खात्री झाली असून तेथील परिसराची पाहणी केली असता माळरानामुळे ठसे आढळून आले नाही. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी व शेतात जाताना समूहाने जावे, असे आवाहन वनरक्षक अमर माने यांनी केल आहे. वनपाल विजय दाते, वनरक्षक काशिलिंग बादरे, शेतकऱ्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला.
१० देवाळे बिबट्या