शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यात बुडून दोन मुलींचा मृत्यू

By admin | Updated: September 12, 2016 01:03 IST

गडहिंग्लज तालुक्यातील कडगावची घटना : एकीला वाचविताना दुसरीही पडली पाण्यात

 गडहिंग्लज : खेळता-खेळता पाय घसरून शेततळ्यात पडलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धनश्री पांडुरंग सागर (वय ९, रा. कडगाव, ता. गडहिंग्लज) आणि सविता परशुराम विभूते (११, सध्या रा. कडगाव, मूळ गाव शिरगाव, ता. चिक्कोडी) अशी या मुुलींची नावे आहेत. पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, कडगावपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावरील अण्णा मार्गानजीक सागर खोरे नावाची वसाहत आहे. त्याच परिसरात पांडुरंग सागर यांच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे. अलीकडेच कर्नाटकातून मोलमजुरीसाठी आलेले विभूते कुटुंबही त्याच ठिकाणी राहते. या परिसरातील बाळासाहेब देसाई यांच्या शेतात खोदण्यात आलेल्या शेततळ्यानजीक धनश्री व सविता दुपारी खेळायला गेल्या होत्या. तळ्याच्या काठावर खेळत असताना प्लास्टिक कागदावरून पाय घसरून सविता तळ्यात पडली. तिला वाचविण्यासाठी धनश्रीने पाण्यात उडी घेतली. मात्र, घाबरलेल्या सविताने तिला मिठी मारल्यामुळे दोघीही पाण्यात बुडाल्या. मुलींच्या ओरडण्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. तोपर्यंत दोघीही पाण्यात गुदमरल्या होत्या. दोघींनाही तत्काळ पाण्याबाहेर काढून उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. दोन्ही गरीब शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या दुर्दैवी मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी) पोहता येत असनूही..! पहिल्यांदा शेततळ्यात पडलेल्या सविताला पोहता येत नव्हते. तिच्यापेक्षाही वयाने लहान असणाऱ्या धनश्रीला पोहता येत होते. तिने जिवाची पर्वा न करता मैत्रीण सविताला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, सविताने घाबरून धनश्रीला मिठी मारल्यामुळे सविताला वाचविण्यासाठी गेलेल्या धनश्रीलाही प्राणाला मुकावे लागले. ‘धनश्री’ एकुलती एक पांडुरंग सागर यांना धनश्री ही एकुलती एक होती. जरळी येथील मामाकडे राहणारी धनश्री तिसरीमध्ये शिकत होती. गणपतीसाठी ती गावी आली होती. तिच्या दुर्दैवी मृत्यूने सागर कुटुंबीयांवर, तर पोटासाठी परगावी आलेल्या सविताच्या मृत्यूने विभूते कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे. कुंपण असूनही घात झाला यंदाच्या समाधानकारक पावसामुळे शेततळे भरले आहे. अंदाजे ८ ते १० फूट पाणी असल्यामुळे धोका नको म्हणून देसाई यांनी तळ्याभोवती तारेचे कुंपण मारले आहे. तरीदेखील अनवधानाने त्या तळ्याकाठी गेल्या आणि घात झाला.