शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी मागणारे दोन डॉक्टर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:11 IST

लोणंद/फलटण : आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याच्या कारणावरून प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील सरकारी अधिकाºयाला ब्लॅकमेल करून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाºया डॉक्टरला

ठळक मुद्दे पत्नीचा गर्भपात केल्याच्या आरोपाखाली ब्लॅकमेल तरडगावात पोलिसांची कारवाईगर्भपाताशी संबंधित सर्व कागदपत्रे डॉक्टर प्रवीण कदम याने माहिती अधिकाराखाली मागवून घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कलोणंद/फलटण : आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याच्या कारणावरून प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील सरकारी अधिकाºयाला ब्लॅकमेल करून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाºया डॉक्टरला त्याच्या सहकाºयासह अटक करण्यात आली.डॉ. प्रवीण कदम (रा. गलांडेवाडी, बारामती), डॉ. नितीन टेळे (रा. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.

याबाबत अधिक महिती अशी की, पशुवैद्यकीय अधिकारी प्रवीण कदम याची पत्नी शुभांगी यांना काही दिवसांपूर्वी तरडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या शुभांगी यांचा त्या ठिकाणी गर्भपात झाला. त्यानंतर गर्भपाताशी संबंधित सर्व कागदपत्रे डॉक्टर प्रवीण कदम याने माहिती अधिकाराखाली मागवून घेतली. तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनिल कदम यांना प्रवीणकडून वेळोवेळी धमक्या येऊ लागल्या. व्हॉट्सअ‍ॅपवरून विचित्र मेसेजही फिरू लागले. या गोष्टीला कंटाळून अनिल कदम यांनी प्रवीणचा मोबाईल नंबर ब्लॉक केला.

सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कमिटीने या प्रकरणाची चौकशी केली. डॉक्टर अनिल कदम यांनी केलेले उपचार व्यवस्थित असल्याचा अहवालही या कमिटीने दिला. मात्र, डॉ. अनिल कदम यांच्यावर कारवाई होण्यासाठी उपोषण करणार असल्याची तक्रार आरोग्यमंत्र्यांकडे प्रवीणने केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी प्रवीणचा सहकारी मित्र डॉ. नितीन टेळे याने फोन करून पंधरा लाखांची मागणी केली. अनिल कदम यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकरणात गुंतविण्याची धमकी दिली.

अखेर तडजोडाअंती पुन्हा त्यांनी दहा लाख रुपये मागितले. यावर डॉ. अनिल कदम यांनी सहमती दर्शविल्यानंतर हे पैसे फलटण येथे आणून देण्याचे ठरले. दरम्यानच्या काळात डॉ. अनिल कदम यांनी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर सापळा रचण्यात आला. पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह त्यांच्या टीमने तरडगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर या दोघांना पैसे घेताना रंगेहाथ पकडले. स्थानिक गुन्हे शाखेने दोघांनाही लोणंद पोलिसाच्या ताब्यात दिले. या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.नोटांच्या बंडलात कोरे कागदतरडगाव येथील एका पेट्रोल पंपाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये गुरुवारी सायंकाळी पैसे देण्याचे ठरले. दोन हजार रुपयांच्या खºयाखुºया नोटेखाली कोरे कागद लावून बंडल तयार करण्यात आले. त्या ठिकाणी आलेले डॉक्टर प्रवीण आणि डॉक्टर नितीन या दोघांनी खंडणीच्या स्वरुपातील सुमारे आठ हजार रुपयांची ही रक्कम स्वीकारताच आजूबाजूला उभारलेल्या पोलिसांनी या दोघांना रंगेहाथ पकडले. वीस हजारांचे मोबाईलही त्यांच्याकडून जप्त करण्यात आले.