शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलेटच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सायबर चौकानजीक भरधाव बुलेटच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले. माणिक हिंदूराव दाभाडे (वय ४४), ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सायबर चौकानजीक भरधाव बुलेटच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले. माणिक हिंदूराव दाभाडे (वय ४४), त्यांचा मुलगा सार्थक दाभाडे (११, दोघेही रा. महालक्ष्मीनगर, उजळाईवाडी, ता. करवीर), अशी दोघा जखमींची नावे आहेत. दाभाडे हे माळी कॉलनीतून सायबर चौकामार्गे राधाबाई शिंदे स्कूलकडे जाताना ही दुर्घटना घडली. दोघांंच्याही पायाल गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बुलेटचालक पसार झाला. याप्रकरणी अज्ञात बुलेटचालकावर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

दोन ठिकाणाहून दुचाकींची चोरी

कोल्हापूर : रंकाळा चौपाटी येथे डीमार्टसमोर अक्षय जयसिंग म्हामूलकर (वय ३२, रा. केसरकर गल्ली, लक्षतीर्थ वसाहत) यांनी रस्त्याकडेला आपली दुचाकी उभी केली होती. अज्ञात चोरट्याने लॉक तोडून ती चोरून नेल्याची घटना घडली, तसेच मिरजकर तिकटी येथे घरानजीक सचिन राजाराम कुऱ्हाडे यांनी पार्क केलेली वीस हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने बनावट चावीने अथवा लॉक तोडून चोरून नेली. या दोन्ही दुचाकी चोरींची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

पतीच्या हल्ल्यात पत्नी जखमी

कोल्हापूर : घरगुती कारणांवरून चिडून पतीने पत्नीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वादातच पत्नीने कोयता हातातून काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पत्नी गीतांजली गोरख यादव (वय ४०, रा. हिरवडे दुमाला, ता. करवीर) यांच्या हाताला दुखापत झाली. याबाबत पत्नीच्या तक्रारीवरून पती गोरख पांडुरंग यादव (वय ५०) यांच्यावर करवीर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

मारहाणीत महिला जखमी

कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) म्हाडा कॉलनी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीतून काठीने व लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत महिला जखमी झाली. सोना महादेव कोरवी (रा. म्हाडा कॉलनी), असे जखमीचे नाव आहे. सुवर्णा आनंदराव मिठारी यांच्या घरातील टाकीचे पाणी कोरवी यांच्या दारातील रांगोळीवर पडत असल्याने त्याबाबत त्यांनी जाब विचारला असता वादावादी झाली. त्यावरून सुवर्णा मिठारी व त्यांचा मुलगा शिवतेज मिठारी (२२, दोघेही रा. पाचगाव) यांनी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार करवीर पोलिसांत नोंद झाली आहे.