शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस असल्याची बतावणी करून दोन कोटींचा दरोडा

By admin | Updated: June 19, 2016 01:48 IST

कोल्हापुरातील घटना : चार तासांतच सर्व मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : ‘तुमच्या व्हॅनमध्ये ड्रग्ज आहेत, आम्ही पोलिस आहोत’ अशी बतावणी करून एका व्हॅनसह ६१५ किलो चांदी, दीड तोळ्याचे सोन्याचे नवीन दागिने, २८ किलो तांब्याच्या धातूचे मणी असा सुमारे दोन कोटी २१ लाख ५९ हजार २२० रुपयांचा दरोडा टाकल्याची घटना शुक्रवारी (दि. १७) रात्री ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे घडली. हा दरोडा पडल्याचे समजताच कोल्हापूर पोलिस दलाने संयुक्तरीत्या शोधमोहीम राबविल्यानंतर उजळाईवाडी विमानतळ परिसरात दरोड्यातील मुद्देमाल, तर पुणे-बंगलोर महामार्गावरील लक्ष्मी टेकडीजवळ व्हॅन मिळून आली. पोलिसांच्या चपळाईमुळे अवघ्या चार तासांत दरोड्यातील माल हस्तगत करण्यात यश आले. याबाबतची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. राणे यांनी सांगितले की, ‘महाद्वार रोड लागून असलेल्या भेंडे गल्लीत साईनाथ एक्सप्रेस सर्व्हिस या कुरिअर सर्व्हिस कंपनीत व्यवस्थापक म्हणून राजकिशोर मास्टर परमार (वय ३०, मूळ गाव रेबियापुरा, ता. बसेरी, जि. ढोलपूर, राजस्थान; सध्या राहणार अन्नपूर्णा बिल्डिंग, आझाद गल्ली, शिवाजी चौक, कोल्हापूर) हे काम पाहतात. याठिकाणी योगेश शर्मा, सुनील परमार, संदीप तोमर, भोले राजाबथ, अंकित परमार हे कामगार आहेत. या कंपनीच्या कोल्हापूर, मुंबई, मालाड, भोलेश्वर, बडोदा, सुरत, अहमदाबाद, राजकोट, दिल्ली, उदयपूर या शहरांमध्ये शाखा आहेत. कोल्हापूरच्या सराफ बाजारपेठेमधून आॅर्डरप्रमाणे माल घेऊन त्याच्या पार्सलचे काम या कंपनीकडून केले जाते. त्यामध्ये चांदी, सोन्याचे ऐवज असा माल असतो. यासाठी कंपनीची व्हॅन (एमएच ०९ -एयू-४८९१) वापरली जाते. या व्हॅनवर संजय केशव नाईक (रा. कदमवाडी, कोल्हापूर) हे चालक आहेत; परंतु त्यांना मधुमेहाचा त्रास असल्याने सध्या त्यांचा मुलगा तुषार ऊर्फ गोट्या संजय नाईक हा चालक म्हणून काम करतो. शुक्रवारी रात्री कोल्हापुरातील ५९ सराफ व्यावसायिकांचे सोन्या-चांदीचे दागिने, ऐवज आणि कामगार योगेश शर्मा व सुनील परमार अशा दोघांना घेऊन चालक तुषार नाईक भेंडे गल्लीतून व्हॅनमधून निघाले. त्यांच्या व्हॅनपाठोपाठ दुचाकीवरून संदीप तोमर, भोले राजाबथ हे दोघे कामगार येत होते. त्यांची व्हॅन शासकीय विश्रामगृहाजवळील महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राजवळ आल्यावर अज्ञात चौघेजण एका कार (एमएच ९१९५) मधून अचानक व्हॅनजवळ आले. त्यांनी कार आडवी घालून व्हॅनमधील चालक नाईक, योगेश शर्मा व सुनील परमार यांना व्हॅनमधून खाली उतरवले. ‘आम्ही पोलिस आहोत, तुमच्या व्हॅनमध्ये ड्रग्ज आहेत’ असे सांगून या तिघांना त्या अज्ञातांनी आपल्या कारमध्ये बसविले. याचवेळी पाठीमागून दुचाकीवरून येणारे कामगार संदीप तोमर व भोले राजाबथ यांना हा प्रकार दिसला. त्यावेळी अज्ञातांची कार लाईन बझारमार्गे कसबा बावड्याकडे भरधाव वेगात निघून गेली. व्हॅन धैर्यप्रसाद मंगल कार्यालयामार्गे कावळा नाक्याकडे निघून गेल्याचे संदीप तोमर यांनी व्यवस्थापक राजकिशोर परमार यांना फोनवरून सांगितले. पोलिसांची सतर्कता... राजकिशोर परमार यांनी नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळविल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेताच तत्काळ अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार यांनी संयुक्तरीत्या मोहीम राबविली. शाहूपुरी, राजारामपुरी, कागल, हुपरी, गांधीनगर, गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलिसांनी पुणे-बंगलोर महामार्गावर संशयितांची शोध मोहिम पहाटे तीनपर्यंत राबवली. त्यामध्ये उजळाईवाडी विमानतळ परिसरातील रस्त्याच्या कडेला चांदी, सोन्याचे दागिने असलेला मुद्देमाल मिळून आला. भोसलेवाडी पार्क-कदमवाडी मध्यवर्ती ठिकाण या कंपनीचा माल भोसलेवाडी पार्क-कदमवाडी येथून दुसऱ्या कारमधून नेहमी पुण्यासाठी पाठविला जातो. पुण्यातून हा माल कंपनीच्या वेगवेगळ्या शाखांकडे पाठविला जात असल्याचे यावेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी सांगितले.