कोल्हापूर : जाधववाडी बापट कॅम्प परिसरातील कसबेकर माळ येथे पार्किंग केलेल्या दोन आराम बसेसना अचानक आग लागली. याबाबतची वर्दी मिळताच महापालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. त्यामध्ये दोन्ही बसेसचे सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नसले तरी अज्ञाताने बसेस पेटवून दिल्याची चर्चा घटनास्थळी होती. ही घटना आज, सोमवारी दुपारी साडेबाराला घडली. अरुण किशोर परिख (रा. यशोदा पार्क, मुक्त सैनिक वसाहत) यांनी दोन आराम बसेस जाधववाडी येथील कसबेकर माळावर पार्किंग केल्या होत्या. आज दुपारी आराम बसेस (एमएच ११ टी-९२१३) व (एमएच १५, एके-४१४) यांना अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट पाहून नागरिकांनी बसेसच्या दिशेने धाव घेतली. या घटनेची माहिती मालक परिख यांना मिळताच त्यांनी अग्निशामक दलास कळविले. जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. आगीमध्ये दोन्ही बसेस जळून फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता. अज्ञातांनी बसेसना आग लावली असल्याची चर्चा घटनास्थळी होती. (प्रतिनिधी)
दोन आराम बसेसना आग
By admin | Updated: December 2, 2014 00:16 IST