शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

दोन आवळे विरुद्ध मिणचेकर

By admin | Updated: October 2, 2014 00:14 IST

स्वबळामुळे लक्ष्यवेधी लढती : फुटीमुळे मतदारसंघाची गणिते बिघडली

दत्ता बिडकर - हातकणंगले (राखीव) विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या १५ आहे. मात्र, काँग्रेसचे माजी खासदार जयवंतराव आवळे, जनसुराज्यचे माजी आमदार राजीव किसन आवळे विरुद्ध शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात लढत होईल. स्वाभिमानीचे प्रमोद कदम व राष्ट्रवादीचे दत्तात्रय घाटगे कोणाची डोकेदुखी ठरणार हेही महत्त्वाचे आहे.काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ गेल्या दोन निवडणुकांमध्ये जनसुराज्य आणि शिवसेनेने काबीज केल्यामुळे यावेळी येथे कमालीची चुरस निर्माण झाली आहे. महायुती आणि आघाडी या दोन्ही बिघाड्यांमुळे चार पक्ष स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रथमच आमने-सामने आल्यामुळे काँग्रेस-शिवसेनेला प्रारंभी दुरंगी वाटणारा सामना जनसुराज्य आणि ‘स्वाभिमानी’च्या शिरकावामुळे लक्ष्यवेधीकडे वाटचाल करीत आहे. परिणामी, मतदारसंघाची संपूर्ण गणिते बिघडून गेली आहेत. जयवंतराव आवळे यांना हा मतदारसंघ सोपा होता; पण आघाडीची बिघाडी झाल्यामुळे आणि काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीने जयवंतराव आवळे यांचे जवळचे सहकारी दत्तात्रय घाटगे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांना कष्ट घ्यावे लागणार आहेत. जनसुराज्य पक्षाचे राजीव आवळे आणि आवाडे कुटुंबीयांचे सख्य असल्याने त्याची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न जनसुराज्यकडून होत आहे.शिवसेनेचे उमेदवार आमदार सुजित मिणचेकर यांना २५ सप्टेंबरअखेर ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. महायुतीचा आपण विद्यमान आमदार असल्याने आपली उमेदवारी निश्चित मानून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, महायुती फुटल्याने समीकरणेच बदलली आहेत. सुजित मिणचेकर यांना शिवसेनेतून सुरुवातीला विरोध होता. हा अंतर्गत वाद संपविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी लागली होती. तरीही सुजित मिणचेकर आणि जिल्हाप्रमुख व संघटना हा वाद धुमसत आहे. तसेच शिवशक्ती व भीमशक्ती असे समीकरण मागील निवडणुकीमध्ये होते. ते आता या निवडणुकीत रामदास आठवले भाजप-स्वाभिमानीबरोबर गेल्यामुळे बौद्ध समाजाच्या मतांवर परिणाम होण्याची चिंता सुजित मिणचेकर यांना वाटत आहे. जनसुराज्यचे राजू आवळे यांची वारणा पट्टा या विभागावर मोठी भिस्त आहे. या पट्ट्यातील फिक्स पॉकेट लक्षात घेऊन त्यांनी हुपरी-रेंदाळपासून ते रुकडी-माणगावपर्यंत आपले संपर्क अभियान सुरू ठेवले असून, ग्रामीण स्तरावर त्यांचा पाच वर्षांत तुटलेला संपर्क विजयापर्यंत नेणार का? याबाबत साशंकता आहे.स्वाभिमानीने प्रमोद कदम यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेला राजू शेट्टी यांना हातकणंगले मतदारसंघात ४८ हजार मतांची आघाडी मिळाली होती. मात्र, त्यावेळी शिवसेनेची स्वाभिमानीला साथ होती. राष्ट्रवादीने दत्तात्रय घाटगे यांना उमेदवारी दिली आहे. गतवेळी २४ हजार मते त्यांनी स्वाभिमानीकडून लढत असताना मिळविली होती. (अपक्ष उमेदवार : सुरेखा कांबळे, परशराम वाघमारे, शिवमूर्ती पिरापगोळ.)हातकणंगले एकूण मतदार ३,0२,२९१ नावपक्षसुजित मिणचेकर शिवसेनाजयवंतराव आवळेकाँग्रेसराजीव आवळे जनसुराज्यदत्तात्रय घाटगे राष्ट्रवादीप्रमोद कदम स्वाभिमानीनंदकिशोर कांबळे कम्युनिस्ट पक्षरणजित भोसलेमनसेकुंदन वाघमारे हिंदू महासभानेमचंद शितोळे (लोकशासन पार्टी)प्रेमकुमार माने बहुजन मुक्ती पार्टीसर्जेराव फुले भारिप बहुजन महासंघनंदकिशोर कांबळे बसपा