शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

महास्वच्छता अभियानाची एकविशी, विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 12:20 IST

कोल्हापूर : महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या महास्वच्छता अभियानाचा सलग एकविसावा रविवार असून यात विवेकानंद ...

ठळक मुद्देमहास्वच्छता अभियानाची एकविशी, विद्यार्थ्यांचा सहभागविवेकानंद, के.एम.सी., गोखले कॉलेजच्या दोनशे विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

कोल्हापूर : महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या महास्वच्छता अभियानाचा सलग एकविसावा रविवार असून यात विवेकानंद महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (के.एम.सी.कॉलेज) व गोपाल कृष्ण गोखले कॉलेजमधील दोनशेहून अधिक विद्यार्थी व दोनशे महापालिका अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी १३ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले.विवेकानंद कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेची शपथ दिली व स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. जयंती नाला संप व पंप हाऊस, पंचगंगा नदी घाट, रंकाळा तलाव परिसर, रिलायन्स मॉल मागे, कोरे हॉस्पिटल या परिसरात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात दोन जे.सी.बी., चार डंपरचा वापर करण्यात आला. रोगराई पसरू नये म्हणून धूर, औषध फवारणी व ब्लिचिंग पावडर टाकण्यात आली.यावेळी पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबंरे, शाखा अभियंता आर. के. पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, पर्यावरणवादी उदय गायकवाड, दिलीप देसाई, आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य एस. वाय. होनगेकर, गोखले कॉलेजचे प्राचार्य बी. के. पाटील, के. एम. सी. कॉलेजचे प्राचार्य एस. एम. गवळी, डी. डी. शिंदे सरकार कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. आर. शेवाळे, मॉर्निंग वॉकचे सुरेश शहा, उल्का शहा, लता चंदवानी, पूजा भोजवानी, ओमप्रकाश भोजवानी, कीर्ती चव्हाण, गीता हेगडे, शीला पाटील, वैजयंती पाटील, आरती दुल्हानी, गुरव सर, नंदा अथने, सुश्मिता गणबोटे, छाया पाटील, झरीना बुवा, अमृता करबकी, मनीषा कुलकर्णी, रजनी डकरे, आरती पाटील, ए. आर. कुलकर्णी, कविता ओबराणी, बाळासो एंडेकर, जिवाजी बेलेकर, मधुकर चव्हाण, राजन डकरे, प्रकाश चौधरी, अमित पाटील, राजेश जाधव, आरोग्य निरीक्षक शुभांगी पोवार, आदी सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर