शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

बारा वर्षानंतर लोकमत’ मधील छायाचित्राने घडली संकेश्वरमधील ‘माय-लेकरा’ची भेट- अश्रूंचा बांध फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 17:52 IST

घोसरवाड (ता. शिरोळ) मधील जानकी वृद्धाश्रमामधील ज्येष्ठ नागरिकांबाबतची बातमी ‘लोकमत’मध्ये छायाचित्रासह प्रसिद्ध झाली. या बातमीतील छायाचित्राने तब्बल बारावर्षांनंतर संकेश्वरमधील लक्ष्मी आणि निलेश बाबर या माय-लेकराची

ठळक मुद्देतब्बल बारा वर्षानंतर झालेली या माय-लेकराची भेट पाहून वृद्धाश्रमातील सर्वजण गहिवरून गेले. या बातमीसमवेत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचे एकत्रित छायचित्र देखील प्रसिद्ध झाले होते. ती बातमी वाचून आणि छायाचित्र पाहून

- संतोष मिठारी

कोल्हापूर : घोसरवाड (ता. शिरोळ) मधील जानकी वृद्धाश्रमामधील ज्येष्ठ नागरिकांबाबतची बातमी ‘लोकमत’मध्ये छायाचित्रासह प्रसिद्ध झाली. या बातमीतील छायाचित्राने तब्बल बारावर्षांनंतर संकेश्वरमधील लक्ष्मी आणि निलेश बाबर या माय-लेकराची भेट घडवून आणली. त्यांच्या भेटीने वृद्धाश्रम गहिवरून गेले.

मूळच्या संकेश्वर (कर्नाटक) येथील असलेल्या लक्ष्मी आणि त्यांचा मुलगा निलेश यांची बारा वर्षांपूर्वी ताटातूट झाली. त्याच दरम्यान लक्ष्मी यांचा अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला. त्यांच्या पायाला मार बसल्याने काहीसे अपंगत्व त्यांना आले. त्यांना त्यांचे गाव, कुटुंब याबाबत काहीच नीट सांगता येत नव्हते.

सीपीआर रूग्णालयातील उपचारानंतर त्या कोल्हापूर शहर, जिल्ह्यात फिरत राहिल्या. कबनूर येथे त्या असताना त्यांची अवस्था काही नागरिकांनी जानकी वृद्धाश्रमाच्या बाबासाहेब पुजारी यांना सांगितली. त्यावर पुजारी यांनी त्यांना आपल्या वृध्दाश्रमात नेले. त्यांच्यावर उपचार सुरू केले. वर्षभरापासून त्या यावृद्धाश्रमात राहत आहेत. ‘मुलाची ठोकर, पण नातवाची वृद्धाचा दु:खावर मायेची फुंकर’ हे वृत्त ‘लोकमत’च्या दि. १५ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले. या बातमीसमवेत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचे एकत्रित छायचित्र देखील प्रसिद्ध झाले होते. ती बातमी वाचून आणि छायाचित्र पाहून लक्ष्मी यांचा मुलगा निलेश याने दि. १६नोव्हेंबरला जानकी वृद्धाश्रम गाठले. त्याला लक्ष्मी यांनी ओळखले नाही. आईची अवस्था पाहून त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. त्याने आपल्या समवेत आणलेले खाद्यपदार्थ आईला भरविले. आई भेटल्याचे समाधान त्याच्या आनंदी चेहऱ्यावरून दिसून येत होते. तब्बल बारा वर्षानंतर झालेली या माय-लेकराची भेट पाहून वृद्धाश्रमातील सर्वजण गहिवरून गेले.‘लोकमत’चे आभारदत्तनगर (कबनूर) येथे ६० वर्षीय लक्ष्मी बाबर या एका पडक्या घरात असल्याचे मला समजले. त्यांची परिस्थिती पाहून, माहिती घेतल्यानंतर त्यांना वृद्धाश्रमात आणले. वैद्यकीय उपचार आणि देखभालीमुळे त्यांची प्रकृती सुधारली. त्या नेहमी म्हणत असत की, माझा एक बाळ आहे, पण कुठे आहे माहित नाही. ‘लोकमत’ मुळे त्यांना त्यांचा मुलगा भेटला. ते पाहून मला खूप आनंद झाला असल्याचे जानकी वृद्धाश्रमाचे बाबासाहेब पुजारी सांगितले. ते म्हणाले, या माय-लेकराची भेट घडविल्याबद्दल मी ‘लोकमत’चे आभार मानतो. लक्ष्मी यांचा मुलगा निलेश हा कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये काम करून उदरनिर्वाह करीत आहे. त्याने दर महिन्याला येऊन आईची भेट देण्याची ग्वाही दिली आहे. वृद्धांना पैसे, जेवणापेक्षा नात्याची जास्त गरज असते. त्यामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांनी भेटून त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधावा, असे आवाहन मी करतो. ‘लोकमत’मधील छायाचित्रामुळे तब्बल बारा वर्षानंतर संकेश्वरमधील लक्ष्मी आणि निलेश बाबर या माय-लेकराची भेट घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमात घडली.