शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लॉकडाऊनमध्ये या चिमुरड्याने तोंडपाठ केल्या सव्वादोनशे राजधान्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 19:30 IST

EducationSector Kolhapur: कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. शाळांना सुट्टी दिली. अनेकांनी या काळात टीव्ही, मोबाइलला मित्र केले, पण शिंदेवाडी ता. कागल येथील अजून शाळेत जाऊन मुळाक्षरे शिकण्यास सुरवातही न करणाऱ्या साडे पाच वर्षांच्या अजिंक्य अरूण मोरबाळे या चिमुरड्याने तब्बल सव्वादोनशे देश, राज्ये आणि त्यांच्या राजधान्या तोंडपाठ केल्या. अवघ्या चार मिनिटात तो सर्व राजधान्या फडाफड सांगतो.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये या चिमुरड्याने तोंडपाठ केल्या सव्वादोनशे राजधान्या साडे पाच वर्षांचा अजिंक्य सांगतो अवघ्या चार मिनिटात फडाफड राजधान्या

अनिल पाटील मुरगूड : कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. शाळांना सुट्टी दिली. अनेकांनी या काळात टीव्ही, मोबाइलला मित्र केले, पण शिंदेवाडी ता. कागल येथील अजून शाळेत जाऊन मुळाक्षरे शिकण्यास सुरवातही न करणाऱ्या साडे पाच वर्षांच्या अजिंक्य अरूण मोरबाळे या चिमुरड्याने तब्बल सव्वादोनशे देश, राज्ये आणि त्यांच्या राजधान्या तोंडपाठ केल्या. अवघ्या चार मिनिटात तो सर्व राजधान्या फडाफड सांगतो.सहा महिन्यापूर्वी सर्वसामान्य मुलांसारखाच या पाच साडेपाच वर्षाच्या अजिंक्यचा दिनक्रम. खेळण्या-बागडण्याचे त्याचे वय. पण कोरोना महामारीच्या संकट काळात त्याच्यातील असामान्य प्रतिभेचा अविष्कार घरच्यांना दिसून आला. अजिंक्यच्या कुटुंबियांना लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या काय करावे हा इतरांसारखाच सतावणारा प्रश्न? मोबाईलवर छत्तीसगडच्या एका मुलीचा व्हिडिओतून त्यांना याचे उत्तर मिळाले. ही मुलगी अवघ्या काही मिनिटात जगभरातील १४५ देशांच्या राजधान्या अस्खलितपणे सांगत होती. या व्हिडिओनेच या कुटुंबियांना प्रेरणा दिली आणि त्यातूनच सुरू झाला अजिंक्यच्या बुद्धीमत्तेचा नवा प्रवास.शेती सेवा केंद्र चालवणारे अजिंक्यचे वडील अरूण मोरबाळे , चुलते कृष्णात मोरबाळे व गृहीणी असलेल्या आईने एका डायरीत जगातील २३१ देशापैकी १८१ देशांच्या राजधान्यासह भारतातील २९ राज्यांच्या राजधान्या लिहून काढल्या. पाठांतरासाठी अजिंक्यची मानसिक तयारी करून घेतली. सुरुवातीला अवघड गेले. पण अजिंक्यची पाठांतराची आश्चर्यकारक क्षमता बघून कुटुंबीयांना हुरूप आला, आणि येथूनच सुरू झाला अजिंक्यच्या पाठांतराचा प्रवास.सतत तीन महिने अजिंक्यच्या कुटुंबीयांनी त्याच्याकडून या सर्वांचे पाठांतर करून घेतले. सुरुवातीपासून अजिंक्य ने दिलेल्या प्रतिसादामुळे या कुटुंबीयांचे मनोधैर्य उंचावले. आणि बघता बघता अजिंक्य सगळे मुखोद्गत सांगू लागला. अनेक देश आणि त्यांच्या राजधान्यांची नावे उच्चारण्यास अवघड आहेत. पण अवघ्या साडेचार मिनिटात अजिंक्य अचूकपणे आणि आत्मविश्वासाने सारे सांगत राहतो कशाही क्रमाने.

नुकतेच त्यांने मुरगूड शहर पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर पाठांतराचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले. अक्षरांचा आणि शब्दांचा गंध नसलेल्या केवळ मौखिक बुद्धिमत्तेच्या देणगीच्या जोरावर पाठांतराचे हे नवे शिखर गाठणाऱ्या अजिंक्यच्या या उपक्रमाचा कुटुंबीयांना अभिमान वाटतो. आता पुढच्या उपक्रमासाठी त्याची विशेष तयारी सुरू आहे.तयारी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी ...भारतात अशा प्रकारचा उपक्रम यशस्वी केलेली किती मुले आहेत याची माहिती या कुटुंबीयांनी इंटरनेट द्वारे घेतली आहे.त्यात गुजरातचा पावणेतीन वर्षाचा रोहन रॉय १९५ देशाच्या राजधान्या ५ मि .२६ सेकंदात तर वैष्णवी श्रीवास्तव ही छत्तीसगडची ६ वर्षाची मुलगी ४ मि.१६ सेकंदात सांगते. अजिंक्य आता ४ मिनीटात २११ देशांच्या राजधान्या सांगतो. त्यामुळे त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी आमची तयारी सुरू आहे. अजिंक्य त्यात निश्चित यशस्वी होईल असा विश्वास असल्याचे अजिंक्यचे वडील अरुण व चुलते कृष्णा मोरबाळे यांनी सांगितले

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर