शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

म्हातारी सरणावरून परतली बारा तासांसाठी

By admin | Updated: July 28, 2014 23:19 IST

सोनाळी येथील घटना : गुलालातील तिरडीवरून उतरवले खाली

रमेश वारके- बोरवडे - जाऊ का नको, जाऊ का नको म्हणत म्हातारी मरता मरता जिवंत झाली. सरणावरून परत आली. मग तिकडे सरणावर कोंबडी जाळली. पुन्हा बारा तासांनी म्हातारीने जाणेच पसंत केले. ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते,’ अशी म्हणण्याची घटना कागल तालुक्यातील सोनाळी येथे आज, सोमवारी सकाळी घडली. बारा तासांनंतर परत मृत्यूने त्या म्हातारीला कवटाळले. आक्काताई विष्णू खोत असे तिचे नाव आहे. या घटनेची चर्चा सोनाळीत रंगली.याबाबत माहिती अशी, सोनाळी (ता. कागल) येथील आक्काताई खोत या वृद्ध महिलेचा काल, रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान मृत्यू झाला. याची खात्री करण्यासाठी डॉक्टरांनी तिला तपासले. श्वासच बंद झाल्याने ती गेल्याचे निश्चित झाल्यानंतर याची माहिती पै-पाहुणे यांना देण्यात आली. गावातही बातमी समजली. बघता बघता ग्रामस्थ व पै-पाहुणे, नातेवाईक गोळा झाले. रात्री आठच्या दरम्यान तिचे स्मशानभूमीत सरणही रचण्यात आले.मृत्यूनंतरचा इतका निधी आटोपून त्या म्हातारीला गरम पाण्याची अंघोळ घालून तिला साडी नेसवून तिरडीवर झोपवले. कफन बांधून गुलाल टाकला. चार खांदेकरी ती तिरडी उचलण्यात पुढे आले असता त्यातील डी. एम. चौगुले यांचे लक्ष त्या वृद्ध महिलेच्या मृतदेहाकडे गेले आणि त्या म्हातारीचे पोट हालत असल्याचे त्यांनी इतरांच्या लक्षात आणून दिले आणि म्हातारी जिवंत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थ व नातेवाइकांची एकच धावपळ सुरू झाली. तिला तिरडीवरून खाली घेतले. बांधलेले कफन सोडून परत त्या म्हातारीला घरी नेले. सर्वजण या घटनेने आश्चर्यचकीत झाले. घरी आणल्यानंतर म्हातारीची हाताची हालचाल सुरू झाली. पण इकडे स्मशानभूमीत तिचे सरण रचले होते. प्रथापरंपरेनुसार त्या सरणात कोंबडी जाळून ते सरण पेटवण्यात आले. परंतु, हा क्षण अवघा बारा तासच टिकला. कदाचित नियतीला हे मान्य नसावे. मृत्यूने अखेर तिला आज, सोमवारी सकाळी सहा वाजता कवटाळले. तिच्या मृत्यूची खात्री झाल्यावरच तिला शेवटी अनंतात विलीन व्हावे लागले. घटना काहीही असो, नियतीपुढे सर्वजण छोटेच असतात. याचे प्रत्यंतर सोनाळीकरांना आज आले. या घटनेची चर्चा मात्र दिवसभर ग्रामस्थांत सुरू होती.