शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

डोंगर विकास, पर्यटनासाठी बारा कोटी मंजूर

By admin | Updated: August 4, 2015 00:16 IST

चंद्रकांत पाटील : विकास कामांचा आराखडा तयार करण्याचे आदेश; जिल्हा प्रशासन प्रस्ताव देणार

सांगली : जिल्ह्यातील डोंगर विकास व पर्यटनाला चालना देण्यासाठी बारा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून, यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती सहकार व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री पाटील यांनी सायंकाळी डोंगर विकास व पर्यटन विकासासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला खा. संजय पाटील, आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, आ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जिल्ह्यातील डोंगर विकास योजनेसाठी राज्य शासनाने दोन कोटीचा निधी मंजूर केला आहे. यामधील शिराळा तालुक्यासाठी १ कोटी, कडेपूर तालुक्यासाठी ५० लाख व खानापूर तालुक्यासाठी ५० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. डोंगर विकासासाठी जिल्हा प्रशासनाकडून कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यानुसार हा निधी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये अंगणवाड्यांच्या इमारतीचे बांधकाम, अंतर्गत रस्ते, सोयी-सुविधांचा समावेश आहे.त्याचबरोबर जिल्ह्यातील पर्यटनाच्या विकासाठी दहा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठीही जिल्हा प्रशासन कृती आराखडा सादर करणार आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पर्यटन महामंडळाला सादर करण्यात येणार आहे. या निधीमधून पर्यटनासाठी अंतर्गत रस्ते, स्थानिक सोयी-सुविधा, दिशादर्शक व माहिती फलक आदींचा समावेश असणार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्या सुचविलेल्या प्रस्तावानुसार तीर्थक्षेत्र व पर्यटनाचा विकास करताना यामधील दहा टक्के निधी हा पोलीस चौकी उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व सुरक्षा व्यवस्थेसाठी खर्च करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी यापूर्वी साडेचारशे कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला असून, याअंतर्गत हा निधी खर्च करण्यात येणार आहे.आ. शिवाजीराव नाईक यांनी चांदोली अभयारण्य व धरणाच्या पर्यटन विकासासाठी प्रस्ताव तयार केला असून, त्यांच्या शिफारशीची दखल घेऊन उपाययोजना करण्यात येणार आहे. यावरही प्रशासनाकडून प्रस्ताव घेऊन तो प्रस्ताव पर्यटन महामंडळाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्री पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)तीर्थक्षेत्रे व पर्यटनाचा विकास करणारजिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे व पर्यटनाचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख ते कोटी रुपयांपर्यंत निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सांगलीचे गणपती मंदिर, कृष्णा घाट, मिरज दर्गा, हरिपूरचे संगमेश्वर मंदिर, हातनूरचे होनाई मंदिर, सिध्दनाथ मंदिर, खानापूर, चांदोली अभयारण्य, बिरोबा मंदिर, आरेवाडी, औदुंबर तीर्थक्षेत्र, ब्रह्मनाथ मंदिर, खंडेराजुरी आदींचा समावेश आहे. मगर हल्ल्यातील मृताच्या कुटुंबास आठ लाखभिलवडी येथे दोन महिन्यापूर्वी मगरीच्या हल्ल्यात बळी पडलेल्या वसंत मोरे यांच्या कुटुंबियांना सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आठ लाखाचा निधी देण्यात आला. यामधील सात लाख रुपये कुटुंबियांच्या नावे अनामत ठेव ठेवण्यात आली असून, एक लाख रुपयांचा धनादेश आज सुपूर्द करण्यात आला.